वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा : खासदार डॉ. पवार
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा : खासदार डॉ. पवार  
मुख्य बातम्या

वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा : खासदार डॉ. पवार

टीम अॅग्रोवन

नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यातील ६० टक्के निधी खर्च झाला आहे. उर्वरित ४० टक्के निधी प्रस्तावित आहे. ही योजना फक्त सुरगाणा तालुक्यात राबवली जात आहे. त्याचप्रमाणे ही योजना कळवण, दिंडोरी व पेठ या आदिवासी तालुक्यात ही सुरू करण्यासाठी केंद्र सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली.  आदिवासी भागातील घटकांच्या विकासासाठी वनबंधू ही स्वतंत्र योजना राबविण्यात येते. या संबंधी आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक खासदार डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली. या बैठकीत विभागांतर्गत प्रामुख्याने ज्या केंद्रीय वनबंधू योजना, विशेष केंद्रीय योजना योजनेचा सखोल आढावा घेण्यात आला.  डॉ. पवार यांनी आदिवासी विभागात सोलर ऊर्जेचे माध्यम वापरून त्यांना वीज उपलब्ध करून द्यावी, खेळाडूंना क्रीडा साहित्यही उपलब्ध करून द्यावे तसेच आदिवासी भागात येणाऱ्या केंद्राच्या योजना तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने काम करण्यासाठी सूचना केल्या.  या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे आयुक्त श्री. कुलकर्णी यांच्यासह महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्रीडाधिकारी, लीड बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे संचालक, पंचायत समिती सुरगाण्याचे गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता, मत्स्यव्यवसाय आयुक्त, जिल्हा परिषद यांसह विविध विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT