fodder processing is the best for livestock
fodder processing is the best for livestock  
मुख्य बातम्या

चाराटंचाईवर मात करण्यासाठी मुरघास फायदेशीर ः डॉ. कड

टीम अॅग्रोवन

निरगुडसर, जि. पुणे ः आधुनिक पद्धतीने मुक्त संचार गोठा पद्धतीचा वापर केल्यास डॉक्‍टरमुक्त गोठा, उत्पादन खर्चात बचत व दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. त्यामध्ये मुरघास खाद्य ही काळाची गरज बनली आहे. चाराटंचाईवर मात करण्यासाठी मुरघास फायदेशीर असल्याचे मत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कड यांनी व्यक्त केले. 

थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील शिवशंकर सहकारी दूध संस्थेच्या गवळ्यांना आजार, आहार, दूध उत्पादनविषयी डॉ. कड यांनी मार्गदर्शन केले. या वेळी दूध संस्थेने आपल्या २०० गवळ्यांना ॲग्रोवन अंकासह २०२० च्या दिनदर्शिकेचे मोफत वाटप केले. या वेळी दूध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब टेमगिरे, उपाध्यक्ष विजय टेमगिरे, सुरेश टेमगिरे, तुकाराम टेमगिरे, रंगनाथ गुंड, सचिव देविदास टेमगिरे यांच्यासह दूध उत्पादक सभासद उपस्थित होते. 

डॉ. कड म्हणाले की, जनावरांमध्ये वंधत्वाच्या प्रमाणात वाढ झाली असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या सकस आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रोटीनयुक्त चारा, जंत, गोचीड निवारण व कॅल्शियम औषधांचा वापर करणे, तसेच मुक्त गोठा पद्धतीनुसार अधुनिक पद्धतीचा वापर केल्यास वंध्यत्वावर मात करणे शक्‍य असल्याचे डॉ. कड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT