मंगळवेढ्यातील चारा छावण्या कागदोपत्रीच
मंगळवेढ्यातील चारा छावण्या कागदोपत्रीच 
मुख्य बातम्या

मंगळवेढ्यातील चारा छावण्या कागदोपत्रीच

टीम अॅग्रोवन

मंगळवेढा, जि. सोलापूर : दुष्काळ जाहीर होऊन दीड महिना झाला. महसूलमंत्र्यांनी छावण्या सुरू करण्याचे आदेश देऊनही महसूल खात्याने कागदोपत्रीच उपाययोजना राबवल्याचे दिसत असल्याने तालुक्‍यातील पशुधन चाऱ्याअभावी संकटात आले आहे.

तालुक्‍यामध्ये सध्या २१ हजार ७२१ लहान व ७३ हजार १६० मोठी असे ९४ हजार ८८१ पशुधन आहे. हिरवा चारा लहान जनावराला साडेसात किलो, तर मोठ्या जनावरांना १५ किलोप्रमाणे १२६०.३०७५ मे. टन चारा लागणार आहे. सुका चारा लहान जनावराला तीन, तर मोठ्या जनावराला सहा किलोप्रमाणे ५०४.१२३ मे. टन इतका प्रतिदिन लागणार आहे. सध्या १४३६५ मे. टन ओला, तर सुका २७०४ किलो इतका चारा उपलब्ध आहे. हा चारा किमान एक महिनाभर पुरू शकेल अशी परिस्थिती आहे. 

पशुसंवर्धन विभागाने वाटप केलेल्या बियाणांचा चारा १५ दिवस पुरेल इतका मार्चमध्ये उपलब्ध होईल. जानेवारी व फेब्रुवारीत काय करायचे, हा प्रश्‍न पशुपालकांसमोर आहे. चारा छावणीऐवजी दावणीला द्यावी, अशी मागणी करत ४५ गावांत आंदोलन झाले.

केंद्रीय पथकाचा एकाच गावात दौरा झाला. महसूलमंत्र्यांनी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या महसूल प्रशासनाने अद्याप तालुक्‍यांमध्ये छावण्या सुरू केल्या नाहीत. उलट काही गावांत तलाठ्यांमार्फत शेतकऱ्याकडून अर्ज भरून घेतले, यामध्ये ते शेतकऱ्यांकडून आधार कार्ड व बॅंक पुस्तक घेऊन शासन व प्रशासनाबद्दलचा रोष शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे छावण्या महसूल प्रशासन सुरू करणार की काय, अशी विचारणा होत आहे. पशुपालकांचे समाधान होईल, असे उत्तर महसूल खात्याकडून दिले जात नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT