flowers
flowers  
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यातील फुलशेतीला २५ कोटींचा फटका

टीम अॅग्रोवन

नगरः ‘कोरोना’ संसर्गामुळे गेल्या महिनाभरापासून वाहतूक बंद असल्याचा गंभीर परिणाम फुल शेतीवर झाला आहे. फुलांची राज्यासह परराज्यात वाहतूक बंद आहे. शिवाय शिर्डीसह जिल्हाभरातील प्रमुख देवस्थानही बंद आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यामधील फुल उत्पादकांना महिनाभरात सुमारे पंचवीस कोटींचा फटका बसला आहे. होणारा खर्चही निघत नसल्याने जिल्ह्यात फुलशेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.  नगर जिल्ह्यामधील नगर, पारनेर, राहाता, संगमनेर, अकोले तालुक्यात फुलशेती केली जाते. जिल्हाभरात सुमारे पाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर फुलशेती असून पारनेर, नगर तालक्यातील गुलछडी, राहाता संगमनेर, अकोले भागात झेंडू, गुलाब, सब्जाचे उत्पादन घेतले जाते. फुल उत्पादनासाठी नगर जिल्ह्यात सुमारे तीनशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस, शेडनेट उभारले आहे. स्थानिक पातळीवर साधारण चाळीस टक्के तर साठ टक्के वाहतुकी द्वारे हैद्राबाद, बडोदा, नागपूर भागात पाठवली जातात. बहुतांश फुलांची वाहतूक एसटी, ट्रॅव्हल्स व वैयक्तिक वाहनांतून केली जाते.  राहाता तालुक्यात सुमारे पन्नास पेक्षा अधिक गावांत फुलशेती केली जात असून त्यात बहुतांश उत्पादक हे गुलाबशेती करतात. या भागातील ७० टक्के फुले शिर्डी येथे वापरली जातात. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आणि हा बंद फुलशेतीच्या मुळावर आला. फुलशेतीतून दररोज होणारी ७० ते ८० लाखाची उलाढाल पूर्णतः थांबली. फुलांची दर दिवसाला तोडणी करावी लागते, अन्यथा दोन दिवसांत फुले खराब होतात व त्याचा परिणाम झाडांवर होतो. त्यामुळे फुलोत्पादकांना नाइलाजाने लाख मोलाची फुले तोडून बांधावर टाकावी लागत आहेत.  अनेक शेतकरी तोडलेली फुले जनावरांनाही खाऊ घालत आहेत. राहाता तालुक्यातील फुलांचा शिर्डीत वापर होतो. दर दिवसाला चार ते पाच लाखाची फुल उत्पादनातून उलाढाल होते, गेल्या महिनाभरापासून साईबाबा दर्शनही बंद असल्याने येथील फुलोत्पादकही आर्थिक फटका सहन करीत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ फुलशेतीतून सुमारे २५ कोटीचे नुकसान झाले आहे. फुलशेतीची उलाढालच बंद असल्याने व मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने फुलशेती उध्वस्त होते की काय अशी भिती जाणकार व्यक्त करत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT