कोयनेत पूरस्थिती शक्‍य : संग्रहित छायाचित्र
कोयनेत पूरस्थिती शक्‍य : संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कोयनेत पूरस्थिती शक्‍य

सकाळ वृत्तसेवा

पाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाणलोट क्षेत्रात 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी आज पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे पावणेसहा फूट उचलण्यात आले. त्यामुळे पायथा वीजगृहासह नदीपात्रात 50 हजार 420 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पूरपरिस्थिती निर्माण होणार असल्याने कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भातील काही भाग आणि दक्षिण महाराष्ट्र येथे पावसाने ओढ दिली आहे, त्यामुळे या भागात गेल्या अडीच महिन्यातील पावसाची सरासरीही गाठली गेली नाही. या पार्श्‍वभूमीवर बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

जोरदार पावसाची शक्‍यता महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि गुजरातचा दक्षिण भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. 17) पश्‍चिम विदर्भ, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT