flood  
मुख्य बातम्या

आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान

आसाम आणि बिहार या दोन्ही राज्यांमध्ये पुराने हाहाकार उडाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आसाममध्ये १२३ जणांचा मृत्यू झाला असून बिहारमध्ये १० जणांना आपले प्राण गमवावे लागले.

वृत्तसेवा

नवी दिल्ली: आसाम आणि बिहार या दोन्ही राज्यांमध्ये पुराने हाहाकार उडाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आसाममध्ये १२३ जणांचा मृत्यू झाला असून बिहारमध्ये १० जणांना आपले प्राण गमवावे लागले. दोन्ही राज्यांमध्ये आत्तापर्यंत ३६ लाख लोक पुराने प्रभावित झाले आहेत. प्रशासनाच्या वतीने लोकांना सुरक्षित स्थळी पोचविण्याचे काम सुरु आहे. सरकारच्या माहितीनुसार आसामध्ये २७ जिल्ह्यांतील तब्बल २६ लाख ३८ हजार लोक प्रभावित झाले आहेत. तर पुरामुळे ९७ जणांचा मृत्यू झाला असून २६ जणांना भूस्खलनामुळे आपले प्राण गमवावे लागले. ग्वालपाडा जिल्हा पुराने सर्वाधिक प्रभावात आहे. जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ७० हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्यापाठोपाठ बारपेट जिल्ह्यातील ४ लाख २४ हजार लोकांना पुराने प्रभावित केले आहे. मोरीगाव जिल्ह्यातील ३ लाख ७५ हजार लोकांना फटका बसला.

नद्या धोक्याच्या पातळीवर  आसाममधील ब्रम्हपुत्रा नदी गुवाहाटी, तेजपूर, धुबरी आणि ग्वालपाडा शहरांमधून धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. ब्रम्हपुत्रेच्या धनसरी, जिया भराली, कोपिली, बेकी आणि संकोश या उपनद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. काजीरंगा उद्यानातील १२७ प्राण्यांचा पुराने मृत्यू झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Agri Exhibition: अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात लाखोंची उलाढाल

Sugarcane Crushing: पुणे जिल्ह्यात ऊस गाळपात बारामती अॅग्रो आघाडीवर

Jijau Jayanti: सिंदखेड राजात हजारो भाविक नतमस्तक

Silk Farming: रेशीम कोषनिर्मिती, चॉकी नर्सरीतून आर्थिक प्रगती

Goldern Berry Production: दुर्गम भागामध्ये गोल्डन बेरी उत्पादन

SCROLL FOR NEXT