Five thousand fines if it comes to the village without permission
Five thousand fines if it comes to the village without permission 
मुख्य बातम्या

विना परवानगी गावात आल्यास पाच हजार दंड

टीम अॅग्रोवन

गडचिरोली ः गावकऱ्यांच्या परवानगी विना गावात प्रवेश केल्यास संबंधिताला पाच हजार रुपये दंड करण्याचा निर्णय मलमपोडूर गावाने घेतला आहे. 

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरी भागात अनेक उपाययोजना प्रशासनाकडून अवलंबिल्या जात आहेत. ग्रामीण भागातही याची अंमलबजावणी होत असली तरी त्याची तीव्रता इतकी नाही. दुर्गम आणि नक्षलप्रवण मलमपोडूर गावाने या बाबत आदर्श जपला आहे. बॅनर व काठ्या टाकत गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यासोबतच गावात येणाऱ्या व्यक्‍तीचे पूर्ण नाव, कोठून आले, कोणत्या कामासाठी गावात प्रवेश पाहिजे आदींची विचारणा केली जात आहे. 

गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्‍तीला आधारकार्डची सक्‍ती करण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला. एवढ्यावरच न थांबता ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय गावात आल्यास पाच हजार रुपयांचा दंडही केला जाणार आहे. तसा ठरावही या गावाने सामूहिकपणे घेतला. 

‘कोरोना’चे रुग्ण जरी शहरी भागात आढळत असले तरी गावस्तरावर खबरदारी न घेतल्यास त्याचा प्रसार खेड्यातही होण्याची भीती आहे. त्यामुळेच गावात प्रवेशबंदी लागू करण्यात आली, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT