Five cattle were killed in the fire
Five cattle were killed in the fire 
मुख्य बातम्या

शेतघराला लागलेल्या आगीत पाच गुरे होरपळली 

टीम अॅग्रोवन

मंडणगड, जि. रत्नागिरी ः मंडणगड तालुक्यातील वलौते येथील शेतघराला लागलेल्या आगीत पाच गुरांचा होरपळून अंत झाला. त्यात सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. ८) दुपारी दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडला. 

वलौते येथील गयासुद्दीन महंमद करेल यांच्या गोठ्यात तिडे आदिवासीवाडी येथील पांडुरंग हिलम वास्तव करून आपली उपजीविका करत होते. ८ मे रोजी संपूर्ण कुटुंब वाड्याबाहेर गेले होते. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. 

या अपघातात वाड्यात बांधून ठेवलेली १ गाभण गाय, ३ दुभत्या गाई, १ पाडा यांची जीवितहानी झाली. पंचनाम्यानुसार वाड्यातील गवताच्या पेंडी, सव्वादोन खंडी भात, तांदूळ, सोन्याचे दागिने, रोख रक्कम जळून खाक झाली. लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT