Fill dams on dry river : MLA Patil
Fill dams on dry river : MLA Patil 
मुख्य बातम्या

कोरडा नदीवरील बंधारे भरून घ्या : आमदार पाटील

टीम अॅग्रोवन

सांगोला, जि. सोलापूर  : ‘‘कृष्णा नदीच्या पुराचे पाणी म्हैसाळ योजनेतून दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय होऊन हे पाणी कोरडा नदीमध्ये सोनंद येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे कोरडा नदीवरील मेडशिंगी गावापर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घ्या’’, अशी सूचना आमदार शहाजी पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली. 

म्हैसाळ, टेंभू, उपसा सिंचन योजना नीरा-उजवा कालवा यांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी (ता. २८) सांगोल्यात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. टेंभू योजनेतून पाणी माण नदीमध्ये मेथवडेपर्यंत व म्हैसाळ योजनेतून पाणी कोरडा नदीवरील मेडशिंगीपर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेणे आवश्‍यक आहे. टेंभू व म्हैसाळ बंदीस्त पाईपलाईनची अपूर्ण कामे गतीने पूर्ण करणे, सांगोला तालुक्‍यातील वंचित गावे या दोन्ही योजनांसोबत नीरा उजवा कालव्याच्या योजनेमध्ये नव्याने समाविष्ट करणे, याचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आमदार पाटील यांनी दिल्या. 

या बैठकीला माजी नगराध्यक्ष रफीक नदाफ, सुनील पवार, टेंभू उपसा सिंचन (एक) सांगलीचे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरूगडे, कार्यकारी अभियंता सचिन पवार, उपविभागीय अभियंता सानप, केंगार, म्हैसाळ (दोन) सांगलीचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, उपविभागीय अभियंता चोपडे यांच्यासह नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले, उपविभागीय अभियंता सुहास शिंदे उपस्थित होते.

सात वर्षांनंतर आले पाणी

सुमारे सात वर्षानंतर कोरडा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. हे पाणी सध्या २०० क्‍यूसेक विसर्गाने कोरडा नदीमध्ये सोडले जात आहे. या पाण्याचा सांगोला तालुक्‍यातील दुष्काळी गावांना मोठा फायदा होणार आहे. सध्या पाऊसमान चांगले आहे. त्यामुळे अडचण नाही. पण, पुढच्या रब्बी हंगामासाठी बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT