pomegranate
pomegranate  
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना प्रतीक्षा फळपीक विमा योजनेच्या आदेशाची

सुर्यकांत नेटके

नगरः मृगबहारासाठी पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत हवामान आधारीत फळपीक विमा योजना राज्यात लागू होत असल्याबाबत पावसाळा सुरु होण्याआधीच कृषी विभागाकडून अध्यादेश लागू केला जातो. यंदा मात्र जून महिना उजाडला तरी अजूनही अध्यादेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे मृग बहारासाठी विमा योजनेचा आदेश कधी निघणार? असा प्रश्न फळबागधारकांना पडला आहे.   संत्रा, मोसंबी, पेरु, चिकू, लिंबू, डाळिंब फळपीकांचे अतीपाऊस, कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त तापमान, वादळ, यासह नैसर्गिक कारणाने नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळावी यासाठी शासनाकडून राज्यात पंतप्रधान फळपीक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक पीक विमा योजना राबवली जाते. खरीप आणि रब्बी हंगामाच्या कालावधीतील वेगवेगळ्या बहाराबाबत विमा योजना लागू करत असल्याचा आदेश कृषी विभागाकडून काढला जातो. गेल्यावर्षी (२०१९) खरीपाच्या तोंडावर मृग बहारासाठी मे महिन्यातच सहा पिकांसाठी पंचवीस जिल्ह्यात पीक विमा योजना राबवली जावी याबाबत आदेश काढला होता. कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी जून व जुलै अखेरपर्यंत सहभागासाठी अवधी दिला होता.   यंदा कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे दोन महिने कृषी विभागाचे बहुतांश कामकाज बंद होते. निधीच्या कमतरतेमुळे अनेक योजनांच्या निधीला शासानाने कात्री लावली आहे. मुळात पंतप्रधान फळपीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक पीक विमा योजनेबाबत पंधरा दिवसांपूर्वीच अध्यादेश निघणे गरजेचे आहे. मात्र अजूनही अध्यादेश निघाला नाही. अध्यादेश का निघाला नाही याबाबत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनाही माहिती नाही. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यंदा पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही फळपीक विमा योजना राबवणेबाबत आदेश निघाला नसल्याने यंदाचा आदेश कधी निघणार याची शेतकऱ्यांना काळजी लागली आहे.  प्रतिक्रिया मृग बहारासाठी फळपीक विमा योजनेत विमा उतरवण्याबाबत दरवर्षी पावसाळा सुरु झाले की सांगितले जाते. मात्र यंदा मात्र अजून फळपीक विम्याबाबत अजून कृषी विभागाकडून विम्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. - प्रदीप वाघ, शेतकरी, तीसगाव, ता. पाथर्डी, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT