agri
agri  
मुख्य बातम्या

कृषी सचिवांच्या गावातील शेतकऱ्यांचा कल प्रयोगशीलतेकडे

टीम अॅग्रोवन

अकोला ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या मूळगावी माळवंडी (जि. बुलडाणा) येथे शेतकरी विविध प्रयोग करू लागले आहेत. यंदा या गावातील शेतकरी शंभर एकरांवर कांदा बीजोत्पादन करीत असून, यासाठी नियमितपणे शेतीशाळा वर्ग सुरू करण्यात आला आहे. श्री. डवले यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला असून, ते कांदा लागवडीवर लक्ष ठेवून आहेत. माळवंडी गावात यंदा १०० एकरांवर कांदा बीजोत्पादन केले जाणार असून, जवळपास हजार क्विंटल कांद्याची लागवड केली जात आहे. दर्जेदार बीजोत्पादन करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने या गावात शेतीशाळा आयोजित केली आहे. तज्ज्ञ म्हणून कृषी सहायक विठ्ठल धांडे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत.  शुक्रवारी (ता. २०) माळवंडी येथे कांदा बीजोत्पादन शेतीशाळेचा दुसरा वर्ग झाला. या वेळी बुलडाणा दौऱ्यावर असलेले कृषिमंत्री दादा भुसे यांनीही धावती भेट दिली. श्री. डवले यांच्यासह विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांची उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात श्री. डवले यांच्या शेतावर मोसंबी लागवड, डॉलर हरभरा, कांदा बीजोत्पादन लागवड व वेस्ट डीकम्पोझर आदींची पाहणी करून सविस्तर चर्चा झाली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT