औरंगाबाद : महावितरणकडून मिळालेले रोहित्र बसविण्यासाठी लाइनमनसह प्रयत्न करताना देवगावचे शेतकरी.
औरंगाबाद : महावितरणकडून मिळालेले रोहित्र बसविण्यासाठी लाइनमनसह प्रयत्न करताना देवगावचे शेतकरी. 
मुख्य बातम्या

रोहित्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : वीज रोहित्राबाबत वर्षोगणती ''गरज तुमची फक्‍त साहित्य आमचं'' अस वागणं महावितरणंच असल्याचं शेतकरी सांगतात. त्यामुळे दैवयोगाने शेतकऱ्यांना जळालेलं वा मागणीनुसार मिळालेलं रोहित्र आणण्यासाठी वाहनाचा खर्च करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मुळात शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांची यासाठी नागवलं जात का, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येतो आहे.

सध्या संपूर्ण मराठवाड्यातच सिंचनासाठी वीज नसल्याने शेतकऱ्यांची परवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बोंड अळीने कपाशीचे पीक गेल्याने त्याऐवजी गव्हाची पेरणी करून पीक घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशेत खंडीत वीजपुरवठ्याने खोडा घातला आहे. शेतकऱ्यांनी वीजबिल भरावे म्हणून योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रोहित्रांचा वीजपुरवठा खंडीत केला गेला आहे.

थकीत वीज देयकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हे पाऊल उचलल्या गेल्याचं यंत्रणेकडून सांगितलं जातं. मुळात खरीप हातचा गेल्याने यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बीवर लागून आहेत. अशात हजारो लाखोची वीज देयक भरायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. जे पेरलयं त्याला व पेराण्याची इच्छा असलेल्यांना पाण्याशिवाय पेरणी करणे शक्‍य होतांना दिसत नाही.

खंडीत वीजपुरवठ्यामुळे पैठण तालुक्‍यातील देवगावातील संतोष बोंद्रे, अशोक गिते, दीपक ढाकणे, नाथा ठोकळ यांच्यासह जवळपास दहा ते बारा शेतकऱ्यांची गव्हाची पेरणी रखडली आहे. या गावातील एका भागातील रोहित्र एक महिन्यापासून जळाले होते. ते मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बरेच प्रयत्न केले.

परंतु दहा ते बारा शेतकऱ्यांनी जवळपास प्रत्येकी तीन हजार प्रमाणे पेसे भरल्याशिवाय त्यांना रोहित्र मिळाले नाही. रोहित्र देत असताना भरून घेतलेली रक्‍कम अपेक्षेप्रमाणे नसल्याने येत्या जानेवारीत अपेक्षित उर्वरीत रक्‍कम भरण्याचं वीज वितरण कार्यालयाने लिहून घेतल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

महिनाभरापूर्वी रोहित्र जळाल्यानं ते खटपट करून मिळवले. लाइनमनला सोबत घेऊन करमाडवरून ते आणले. त्यासाठी जवळपास चार हजार खर्ची घातले. रोहित्र बसविण्यासाठी लाइनमनला मदत म्हणून कसरत केली ती वेगळीच. दीपक ढाकणे, शेतकरी देवगाव. ता. पैठण

दीड एकरातील कपाशी बोंड अळीनं संपली. त्याऐवजी गहू पेरायचा होता, पणं डीपी जळाला. त्यामुळे पंधरवड्यापासून गव्हाची पेरणी इच्छा असूनही करू शकलो नाही. डीपी मिळाला पण अजून लाइन सुरू व्हायची आहे. - नाथा ठोकळ, देवगाव, ता. पैठण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT