मुख्य बातम्या

मावळातील शेतकऱ्यांची इंद्रायणी भाताला पसंती

सकाळ वृत्तसेवा

कामशेत, जि. पुणे ः मावळ तालुक्‍याची ओळख असलेला आणि आंब्याच्या मोहराप्रमाणे सुगंध असणाऱ्या आंबेमोहर तांदळाचे उत्पादन संपुष्टात आले आहे. खवय्यांच्या चवीला उतरलेल्या इंद्रायणीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. फुले समृद्धीही ग्राहकांच्या पसंतीला उतरू लागली आहे.   पुणे जिल्ह्यात पूर्वीपासून मावळ, मुळशी, भोर, वेल्हे या चारही तालुक्‍यांत होणाऱ्या पावसामुळे येथील भात हे मुख्य पीक. पूर्वीपासून या तालुक्‍यांत आंबेमोहरचे उत्पादन व्हायचे. परंतु आंबेमोहरचा उत्पादनखर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याचे गणित जुळत नसल्याने शेतकऱ्यांना ते परवडत नाही. परिणामी गेल्या काही वर्षांपासून त्याच्या उत्पादनात घट झाली. यंदा उत्पादन नसल्यात जमा आहे.  आंबेमोहरच्या पडत्या काळात इंद्रायणी वाणाच्या तांदळाने बाजी मारली. कमी खर्चात अधिक उत्पादन आणि त्याचा पेंढाही चांगला होत असल्याने किफायतशीर ठरू लागला, त्यामुळे उत्पादनात वाढ होत गेली. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भाताचे उत्पादन चांगले आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी प्रश्नी राजू शेट्टी आक्रमक, २३ मार्चला मुंबई -गोवा महामार्ग रोखणार

Unseasonal Rain: अर्धापुर तालुक्यात वादळी पावसासह गारपीट

Unseasonal Rain: ऐन पाडव्याला सोलापुरात बळीराजाच्या डोळ्यात पाणी

POCRA Scheme: पोकरा अंतर्गंत वैयक्तीक लाभाच्या घटकांसाठी साडेदहा हजारांवर अर्ज

Forest Fire: सिन्नर तालुक्यातील वनसंपदा नष्ट

SCROLL FOR NEXT