crop insurance  
मुख्य बातम्या

‘त्या’ विमाधारकांना अखेर मिळाले परतावे

बँक खात्यांच्या तांत्रिक चुका, कर्जखाते बंदमुळे आलेल्या अडचणी दूर करून बँका, विमा कंपनीने जिल्ह्यातील पात्र विमाधारकांना केळी पिकासंबंधी परतावे दिले आहेत.

टीम अॅग्रोवन

जळगाव ः बँक खात्यांच्या तांत्रिक चुका, कर्जखाते बंदमुळे आलेल्या अडचणी दूर करून बँका, विमा कंपनीने जिल्ह्यातील पात्र विमाधारकांना केळी पिकासंबंधी परतावे दिले आहेत. ‘अॅग्रोवन’ने यासंबंधी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी घेतली.  शेतकरी याप्रश्‍नी पाठपुरावा करीत होते. बँकांच्या चकरा मारीत होते. यासंदर्भात चहार्डी (ता. चोपडा) येथील शेतकरी जे. टी. पाटील यांनी ‘अॅग्रोवन’कडे व्यथा मांडली. या समस्येला वाचा फोडण्यात आली. यात अनेक बँका प्रधानमंत्री फळ पीकविमा योजनेतून २०१९-२० या वर्षासंबंधी अनेक पात्र शेतकऱ्यांना केवळ कर्जखाते बंद केले, बँक खात्यासंबंधी झालेली चूक यामुळे परतावे देण्यासंबंधी असमर्थता दाखवीत होत्या. विमा कंपनीशी संपर्क साधा, आमचा संबंध नाही, असे काही बँका सांगत होत्या.  यात चहार्डी येथील शेतकऱ्याचे परतावे केवळ संबंधित बँकेतून नव्या वर्षासाठी पीक कर्ज घेतले नाही. जुने कर्ज खाते बंद केले. त्या कर्जखात्यावर विमा परतावे प्राप्त झाले. पण ते खातेच बंद असल्याचे कारण सांगून देण्यास बँक असमर्थता दाखवीत होती. ही समस्या मांडल्यानंतर संबंधित बँक, विमा कंपनीने दखल घेतली. तसेच रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे यांनीही जिल्हा प्रशासनाशी याबाबत संपर्क साधला. ही समस्या सोडवा. शेतकऱ्यांना परतावे तातडीने द्या, अशी सूचना केली. यानंतर संबंधित शेतकऱ्यांना परतावे देण्यास सुरुवात झाली.

प्रतिक्रिया विमाधारक केळी उत्पादकांना रखडलेले विमा परतावे मिळण्यास सुरुवात झाली आहे. ‘अॅग्रोवन’ने या प्रश्‍नी वाचा फोडली. यामुळे हे परतावे मिळण्यास सुरुवात झाली. खासदार रक्षा खडसे यांनीही यासाठी पाठपुरावा केला.  - जे. टी. पाटील, शेतकरी, चहार्डी (जि. जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Dealers Issue: निविष्ठा विक्रेत्यांना आरोपीच्या यादीतून कायमचे वगळा

Sugarcane Bill: प्रति टन १५ रुपये कपातीतून शेतकऱ्यांच्या पैशांवर दरोडा

Flower Rate: झेंडूच्या फुलांनी खाल्ला भाव

Pune Rainfall: जून ते सप्टेंबरपर्यंत ९८ टक्के पाऊस

US Employment Crisis: अमेरिकेत नोकर कपातीचे संकट

SCROLL FOR NEXT