crop insurance
crop insurance  
मुख्य बातम्या

हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित 

टीम अॅग्रोवन

नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. याबाबत विमा भरलेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीत विमा कंपनीला ७२ तासांच्या आत कळविण्याची मुदत होती. परंतु या कालावधीत कंपनीचा टोलफ्री नंबर बंद होता. तर ई-मेलव्दारे कळविण्यासाठी शेतकऱ्यांना जमले नाही. यामुळे नुकसान झालेले हजारो शेतकरी दावे दाखल करण्यापासून वंचित राहिले आहेत. 

जिल्ह्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. यावेळी अनेकवेळा अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. सखल भागातील शेताचे तळे झाले होते. यामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर, मुग, उडीद, ज्वारी यासह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचे प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानीबाबत कळविण्याचे आवाहन केले होते. परंतु या कालावधीत पावसामुळे अनेक भागात वीज खंडित झाली होती. तसेच विमा कंपनीचा टोलफ्री नंबर लागला नाही. विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधीही फोन घेत नव्हते. ई-मेल करण्यासाठी शेतकऱ्यांकडे यंत्रणा नसल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना नुकसानीबाबत दावे दाखल करता आले नाहीत. यामुळे नुकसान होऊन अनेकांना भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे.  प्रतिक्रिया  अतिवृष्टीनंतर विमा कंपनीकडे क्लेम करण्यासाठी दिलेला टोलफ्री नंबर लागत नव्हता. कंपनीचे प्रतिनिधीही फोन उचलत नव्हते, यामुळे नुकसान होवूनही दावा दाखल करता आला नाही.  - माधव कदम, शेतकरी, लिंगणकेरुर, ता. देगलूर   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT