संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कर्जमाफीचा घोळ संपता संपेना

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्ह्यात दोन लाख ४७ हजारांपेक्षा अधिक कर्जमाफीचे लाभार्थी आहेत. यातील निम्मे लाभार्थींनाही लाभ मिळालेला नसून, आता पुन्हा सात हजार संभाव्य लाभार्थींची यादी दुरुस्तीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आली आहे.

दुरुस्तीसाठी आणखी एक महिना लागेल की दोन महिने, असा मुद्दा आहे. कर्जमाफीचा घोळ वाढतच असून, रोज नव्या त्रुटी व नव्या तक्रारी येत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात जळगाव तालुक्‍यात मध्यंतरी लाभार्थींची ग्रीन यादी आली. त्यात धानवड (ता.जि.जळगाव) येथील चार शेतकऱ्यांची दुबार नावे आली. म्हणजेच यापूर्वी ज्यांना लाभ मिळाला, त्यांची नावे पुन्हा आली. अशातच अलीकडेच सात हजार संभाव्य लाभार्थींची ''यलो'' यादी आली असून, त्यासंबंधी दुबार नावे वगळण्याची कार्यवाही करून दुरुस्ती करावी लागणार आहे. यासाठी महिनाभर वेळ लागतो की अधिक हादेखील मुद्दा आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयास त्यासाठी कार्यवाही करावी लागणार असून, सुनावण्या घ्याव्या लागतील. सुनावणीसाठी संभाव्य लाभार्थी शेतकरी व बॅंकेलाही बोलावले जाईल. लाभार्थी यादीत दुबार नावे दोन ते तीन बॅंकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची येत आहेत. एका शेतकऱ्याला दोनदा लाभ मिळू नये म्हणून सुनावण्या व दुरुस्ती ही सर्कस करावी लागणार आहे.

नियमित लाभार्थी प्रतीक्षेत जिल्हा बॅंकेचे कर्जदार लाभार्थी अधिक असून, सध्या अनेक नियमित कर्जदार लाभार्थी २५ टक्के सवलतीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांनी सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज भरले, त्यांचीच नावे ग्रीन यादीत आलेली नसल्याची माहिती मिळाली.

कर्मचारी सुटीलाही कामावर

कर्जमाफीच्या घोळात मागील दोन महिन्यांत जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखा परीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना दुसरा व चौथा शनिवार आणि रविवारची सुटीही मिळालेली नाही. फक्त दिवाळीलाच त्यांना सुट्या होत्या. अशातच मध्यंतरी एका सहायक निबंधकाला कामाच्या ताणामुळे हृदयविकाराचा झटका आला होता, असे सूत्रांनी सांगितले.

कर्जमाफीचा लाभ जळगाव जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक शेतकऱ्यांना मिळाला आहे. डोळ्यात तेल घालून यासंबंधीचे काम करावे लागत आहे. दुबार लाभार्थी वगळण्यासाठी सुनावण्या घ्याव्या लागणार आहेत. - अशोक बागल, प्रभारी सहायक जिल्हा उपनिबंधक, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT