आठ शेतकरी उत्पादक कंपन्या उतरल्या शेतमाल खरेदीत
आठ शेतकरी उत्पादक कंपन्या उतरल्या शेतमाल खरेदीत 
मुख्य बातम्या

औरंगाबादला शेतकरी कंपन्या उतरल्या शेतमाल खरेदीत

Santosh Munde

औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील आठ शेतकरी उत्पादक कंपन्या थेट शेतमाल खरेदीत उतरल्या असून मूग, उडीद, सोयाबीन पाठोपाठ मकाचीही खरेदी या कंपन्यांनी सुरू केली आहे. 

औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत ४० शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आकार घेतला. जवळपास वीस गटांच्या माध्यमातून एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १३, जालना जिल्ह्यांतील १३ व बीड जिल्ह्यातील १४ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद तालुक्‍यातील दोन, सिल्लोड व कन्नड तालुक्‍यांतील प्रत्येकी एका कंपनीने मकाच्या खरेदी सुरू केली आहे. जालना व भोकरदन तालुक्‍यातील प्रत्येकी दोन शेतकरी उत्पादक कंपन्या शेतमालाच्या खरेदीत उतरल्या आहेत. या कंपन्यांनी मूग, उडीद व सोयाबीनच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. गतवर्षी जालना जिल्ह्यातील रेवगावच्या जडाई माता व पूर्णा केळणा फार्मर प्रोड्युसर कंपनीने तूर खरेदीत सहभाग घेतला होता.  औरंगाबाद जिल्ह्यातील चारही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आजवर जवळपास साडेतीनशे टन मकाची खरेदी केल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. गतवर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील सहा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जवळपास १३७८ मेट्रिक टन तुरीची खरेदी केली होती. त्यामुळे या कंपन्यांची उलाढाल ६ कोटी ९४ लाख रुपयांवर पोचली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ शेतकरी उत्पादक कंपन्यांना दालमीलचे वाटप केले असून या कंपन्यांकडे ५० ते १०० क्‍विंटलची दाळ तयार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. बीड जिल्ह्यातील १४ शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनी  गतवर्षीच्या तूर खरेदीत सहभाग घेतला होता. यंदा मात्र अजून कोणतीही शेतकरी उत्पादक कंपनी खरेदीत पुढे आली नसल्याची माहिती आत्माच्या वतीने देण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT