crop loan
crop loan 
मुख्य बातम्या

कर्जमाफीच्या अनुषंगाने होणार शेतकऱ्यांच्या खात्यांची चाचणी

टीम अॅग्रोवन

अकोला: राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी’ योजनेंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांचे बँक खाते तपासण्यासाठी एक प्रायोगिक चाचणी राज्यातील काही जिल्ह्यात घेतली जाणार आहे. यात अकोला जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करून खात्यांची खात्री केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, की कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात भरताना अनेकदा चुकीचे खाते क्रमांक असल्याच्या बाबी समोर येतात. यामुळे शेतकऱ्यांच्या रोषाला प्रशासनाला बळी पडावे लागते. या वेळी सरकारने जाहीर केलेली दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यापूर्वी कुठेही शासनाची बदनामी होणार नाही, यासाठी काळजी घेतल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाच्या नियोजनानुसार राज्यातील काही जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करून खात्यांची खातरजमा करण्याचे नियोजन केले जात आहे. यात अकोला, नगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग केला जाईल, असे सांगितले जात आहे. शासनामार्फत राबविल्या जात असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत एक एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे  थकीत असलेले कर्ज माफ करण्याची शासनाने घोषणा केली आहे. यानुसार कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करताना कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे.  गावनिहाय याद्या प्रसिद्ध करणार कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. बँक शाखा, सहकारी संस्थांचे कार्यालय, ग्रामपंचायत अशा ठिकाणी याद्या प्रसिद्ध होतील. यावर शेतकऱ्याला एक युनिक क्रमांक दिलेला राहील. हा क्रमांक घेऊन शेतकऱ्याला सुविधा केंद्रावर जावे लागेल. तेथे आपल्या खात्याची व आपल्याकडे असलेल्या कर्जाच्या रकमेची खातरजमा करून सहमती दर्शवावी लागेल. शेतकऱ्याने सहमती दर्शविताच पुढील कर्जमाफीची प्रक्रिया होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT