Farmer manufacturing companies Benefit through NABARD 
मुख्य बातम्या

शेतकरी उत्पादक कंपन्यांना  नाबार्डच्या माध्यमातून लाभ 

नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध योजनांचा लाभ विविध संस्थांमार्फत दिला जात आहे. या कंपन्यांनी नाबार्ड अंतर्गत प्रमाणित संस्थाच्या माध्यमातून लाभ घेणे अपेक्षित आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध योजनांचा लाभ विविध संस्थांमार्फत दिला जात आहे. या कंपन्यांनी नाबार्ड अंतर्गत प्रमाणित संस्थाच्या माध्यमातून लाभ घेणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी रोहन मोरे यांनी केले. 

नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र आणि ग्रीन इनोवेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीनदिवसीय शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रम सोमवारपासून (ता.२१) सुरू केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, कृषी विस्तार विषय तज्ज्ञ राहुल घाडगे, ग्रीन इनोव्हेशन सेंटरचे टोमॅटो व्हल्यू चेन तज्ज्ञ संजीव राठोड, संगीता पाटील, संदीप उफाडे आदी मान्यवर व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक गणेश चव्हाण, रामदास चव्हाण, रत्नप्रभा काकडे, राहुल घोडेकर, आदिनाथ वरे, मनीष मोरे उपस्थित होते. 

मोरे म्हणाले, ‘‘नाबार्डने कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव या संस्थेला शेतकरी उत्पादक कंपन्यासाठीची प्रोत्साहन देणारी संस्था म्हणून मान्यता दिली आहे. या माध्यामतून ५ शेतकरी उत्पादक कंपन्यांना या प्रकल्पा समाविष्ट केले असून, विविध व्यवसायांच्या उभारणीसाठी व्यवसाय विकास निधी रुपये पाच लाखांचा दिला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या कंपन्यांनी आपले प्रस्ताव कृषी विज्ञान केंद्रमार्फत सादर करावेत. या प्रकल्पांतर्गत जुन्नर तालुक्यातील ४ व शिरूर तालुक्यातील १ शेतकरी उत्पादक कंपनीची निवड केली आहे.’’ 

कृषिरत्न अनिल तात्या मेहेर म्हणाले, ‘‘येणाऱ्या काळात शेतकरी उत्पादक कंपन्या या शेतकऱ्यांना परिणामी कृषी क्षेत्राला दिशादर्शक ठरतील. नाबार्ड कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना बळकटी देण्याचे काम आर्त असून, या उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना विविध सोयी-सुविधांबरोबर कृषी विषयक बाजारभाव व हवामान आधारित माहिती पोहचविली पाहिजे.’’ 

केव्हीकेचे प्रमुख प्रशांत शेटे म्हणाले, ‘‘कृषी विज्ञान केंद्राकडे असलेल्या प्रकल्पामार्फत शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुढील तीन वर्षाकरिता प्रशिक्षण दिले जाईल. या कंपन्यांना नवनवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.’’ दरम्यान गोळेगाव येथे शतायुषी ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनीने उभारलेल्या भाजीपाला कलेक्शन सेंटरला प्रशिक्षणार्थीनी भेट दिले. कार्यक्रमात केव्हीकेचे कृषी विस्तार तज्ज्ञ राहुल घाडगे यांनी प्रास्ताविक केले. तर जगदीश ढमढेरे यांनी आभार मानले. 

प्रशिक्षणात या कंपन्याचे प्रतिनिधीचा होता सहभाग :  या प्रशिक्षणात कृषी नवकल्पना शेतकरी उत्पादक कंपनी, नारायणगाव, ता. जुन्नर, ग्लोबल फ्रेश शेतकरी उत्पादक कंपनी, नारायणगाव, ता. जुन्नर, फार्मसेल शेतकरी उत्पादक कंपनी, पिंपरखेड, ता. शिरूर, शतायुषी ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनी, शिरोली, ता. जुन्नर, पारगाव तर्फे आळे शेतकरी उत्पादक कंपनी, पारगाव, ता. जुन्नर, भामा भीमा शेतकरी उत्पादक कंपनी, खेड, सातगाव पठार शेतकरी उत्पादक कंपनी, आंबेगाव या कंपन्याचे ४० हून अधिक संचालक सदस्य उपस्थित होते.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT