शेतकरी समूहाने संघटित रिटेल साखळी उभारणे गरजेचे ः प्रतापराव पवार 
मुख्य बातम्या

शेतकरी समूहाने संघटित रिटेल साखळी उभारणे गरजेचे ः प्रतापराव पवार

टीम अॅग्रोवन

नाशिक : शेतमालाला योग्य आणि स्थिर भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी संघटित रिटेल साखळी उभारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले. मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे भेटीप्रसंगी ते बोलत होते.

श्री. पवार म्हणाले की, शेतमाल विक्रीसाठी रिटेल साखळी उभारताना ती शेतकरी संचालित असणे गरजेचे आहे. शेती उत्पादनामध्ये ताजा आणि प्रक्रियायुक्त भाजीपाला, फळे रिटेल साखळीच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोचली तर शेतकऱ्यांना योग्य परतावा मिळू शकतो. अशा प्रकारची यंत्रणा सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उभी राहण्यास सुरवात झाली आहे, याचा अतिशय आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.  

सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली. द्राक्ष पॅक हाऊस, केळी निर्यात, पल्प प्रक्रिया केंद्र आदी विभागांना त्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या कृषी अवजारे विक्री केंद्राची पाहणी करून त्याठिकाणी शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध असणाऱ्या सर्व उत्पादनांची माहिती त्यांनी घेतली. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकरी सभासद यांच्या पाठीशी सकाळ माध्यम समूह कायम राहील याची ग्वाही त्यांनी दिली. सह्याद्री फार्मर्सचे उत्पादन विभागाचे प्रशांत जयकृष्णीया, संशोधन विभागाचे रुपेश किश्ते, तुषार जगताप यांनी कंपनीविषयी माहिती दिली. या वेळी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

नवीन पेटंट द्राक्ष प्रजातींची घेतली माहिती  सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून दीड वर्षापूर्वी  आरा - १५, आरा -१९, इनिया  वन या पेटंट मिळालेल्या द्राक्ष प्रजातींची पाहणी श्री. पवार यांनी केली. त्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत निर्माण होणाऱ्या संधीची माहिती त्यांनी जाणून घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT