कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू शकत होता : पवार
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू शकत होता : पवार  
मुख्य बातम्या

कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू शकत होता : पवार

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाआधीही शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कुठेही विकता येत होता, याकडे लक्ष वेधताना नव्या कृषी विधेयकाला सर्वस्तरातून विरोध होत आहे, हा विरोध लक्षात घ्या, आज विविध पक्ष, संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. पण यापुढे शेतकरीच त्याच्या विरोधासाठी नेतृत्व करतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मंगळवारी (ता.२९) पंढरपुरात कृषी विधेयकाबाबत आपले मत व्यक्त केले.

पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी श्री. पवार पंढरपुरात आले होते. तत्पूर्वी भोसे (ता.पंढरपूर) येथील पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तिघांचे कोरोनाने गेल्या महिन्यात निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांचीही पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. कृषी विधेयकासह संजय राऊत- फडणवीस भेट, सुशांतसिंग प्रकरण, मराठा आरक्षण या सध्याच्या घडामोडींवर त्यांनी मते व्यक्त केली. श्री. पवार म्हणाले, संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या मुलाखती घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे काळजी नसावी, सरकार पाचवर्षे टिकेल. सुशांतसिंग प्रकरणी केंद्र सरकारने विविध तपास संस्था कामाला लावल्या. पण आज काय, सर्वांनाच दिसते आहे. आज हा तपास भलतीकडेच सुरु आहे. मराठा आरक्षणावर छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे या दोघांना भाजपने खासदार केले आहे. ते त्यांचीच बाजू मांडणार. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा, असा टोलाही लगावला.

विरोधी पक्षांना एकत्र करणार कृषी विधेयकाच्या विरोधात विविध राज्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे. उत्पादन खर्चाचा विचार करुन शेतीमालाला किंमत देण्याचे धोरण सरकारने ठेवायला हवे. या विधेयकांमध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. विधेयकासंदर्भात सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित करुन काय निर्णय घेता येईल, याचाही विचार सुरु असल्याचे श्री. पवार म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT