Famous writer, social worker Dr. Anil Avchat passes away
Famous writer, social worker Dr. Anil Avchat passes away 
मुख्य बातम्या

प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे निधन

टीम अॅग्रोवन

पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे गुरुवारी (ता. २७) सकाळी दीर्घ आजाराने पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. पत्रकारिता करीत असतानाच त्यांनी विविध सामाजिक प्रश्‍नांवरील लेखन, ललित लेखन, काव्य लेखनासह ओरिगामी, बासरीवादन, गायन अशा अनेक कलांद्वारे आपल्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून दिली होती.

डॉ. अवचट यांच्या पायावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना घरी आणण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडली त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुक्ता आणि यशोदा या दोन मुली आहेत. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पत्रकारनगर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील ओतूर (ता. जुन्नर) इथं त्यांचा जन्म झाला. त्यांनी पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. 

डॉ. अवचट यांच्यासारखे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्यातून जाणे, क्लेशदायक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली. तर डॉ. अनिल अवचट म्हणजे व्यक्तिगत व सामाजिक जाणिवांचा मेळ घालून आयुष्य कसे जगावे याचा आदर्श होते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. 

‘‘अनिल अवचट केवळ कला व साहित्यकार नव्हे तर परिवर्तनाच्या मुक्तांगणातील खिलाडी होते,’’ असे मत नर्मदा आंदोलनाचे व जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे साथी मेधा पाटकर यांनी श्रद्धांजली वाहताना व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT