शेतकऱ्यांना ऑनलाइन नावनोंदणीसाठी मुदतवाढ
शेतकऱ्यांना ऑनलाइन नावनोंदणीसाठी मुदतवाढ 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना ऑनलाइन नावनोंदणीसाठी ३०पर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : राज्यात नाफेडच्यावतीने या हंगामात सुरू केलेल्या शेतीमाल खरेदीसाठी शेतकऱ्यांना अाॅनलाइन नावनोंदणी करण्याकरिता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात अाली अाहे. शेतकऱ्यांना अाता शुक्रवारपर्यंत (ता. ३०) नावनोंदणी करता येणार अाहे.   

जिल्ह्यात नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतीमाल खरेदी केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीने करण्यात येत अाहे. यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद व मूग या शेतीमालाची ऑनलाइन नोंदणी करणे अावश्यक अाहे. नोंदणीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात अाली होती. काही ठिकाणी नावनोंदणीला उशिरा परवानगी मिळाली. त्यामुळे अशा केंद्रांचा विचार करून राज्यात सर्वत्र १५ दिवसांची वाढ देण्यात अाली. यानुसार अाता शेतकरी त्यांची नावनोंदणी ३० नोव्हेंबरपर्यंत करू शकणार अाहेत. सोयाबीनचा आधारभूत दर ३३९९ रुपये क्विंटल असा जाहीर झालेला आहे.

नोंदणीकरिता शेतकऱ्यांना आधार कार्डची छायांकित प्रत व विक्रीस आणलेल्या शेतमालाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक खरेदी केंद्रावर द्यावा. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमावारीनुसार शेतीमाल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन या निमित्ताने जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

SCROLL FOR NEXT