महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी 
मुख्य बातम्या

महात्मा फुले कृषी विद्यापीठात सोमवारपासून किसान आधार संमेलन

sandeep navale

राहुरी, जि. नगर  : महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात सोमवार (ता. २५) ते शुक्रवार (ता.२९) सप्टेंबर या कालावधीत भव्य किसान आधार संमेलनाचे आयोजन केले आहे. हे संमेलन सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

या किसान आधार संमेलनात शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन, विविध पिकांची प्रात्यक्षिके, पशू प्रदर्शन आणि विविध कृषी विषयांवर व्याख्याने व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या किसान आधार संमेलनातील पीक प्रात्यक्षिकांमध्ये तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, चारा आणि नगदी पिकांमधील विविध ३० पिकांचे १०१ वाण, १४ भाजीपाला पिकांचे २८ वाणांचे प्रात्यक्षिके बघता येणार आहे.

या व्यतिरिक्त गायी, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्यांच्या विविध जाती, तसेच कृषी अवजारे शेतकऱ्यांना पाहण्यास मिळणार आहेत. प्रदर्शनस्थळी कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, कृषी विभागाच्या योजना, विविध खासगी कंपन्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांना एकाच दालनाखाली पाहण्यास मिळणार आहे. याचबरोबर सिंचन प्रणाली, निचरापद्धती, माती परीक्षण प्रात्यक्षिके, एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल, गांडूळखत उत्पादन प्रकल्प, मधुमक्षिकापालन, जिवाणू खते, जैविक कीड नियंत्रण, एकात्मिक कीड व्यवस्थापन इत्यादी कृषी तंत्रज्ञान पाहण्याची व जाणून घेण्याची संधी यानिमित्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रसंगी प्रत्येक दिवशी विविध विषयांवर कृषी शास्त्रज्ञांचे आणि प्रगतिशील शेतकऱ्यांची व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. किसान आधार संमेलनास राज्यातील आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी भेट देऊन तंत्रज्ञान आत्मसात करावे, तसेच शास्त्रज्ञ व प्रगतिशील शेतकऱ्यांशी सुसंवाद साधावा, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले.

हे किसान आधार संमेलन शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या किसान आधार संमेलनात सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : संवेदनशील कांदा, असंवेदनशील राज्यकर्ते

Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूर ७१ तर हातकणंगलेमध्ये ६८ टक्के चुरशीने मतदान

Cotton Farming : कापसाची करुण कहाणी

Onion Rate : कांदा पुन्हा गडगडला

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

SCROLL FOR NEXT