Excited response to 'Janata curfew' in Nashik district
Excited response to 'Janata curfew' in Nashik district 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यू’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम अॅग्रोवन

नाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सकाळी सात वाजल्यापासून शहरातील सर्वच रस्त्यांवर सर्वत्र शांतता पाहायला मिळाली. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला गांभीर्याने घेत नागरिकांनी जबाबदारीने तंतोतंत सूचनांचे पालन केल्याचे दिसून  आले. 

शहरातील विविध भागांमध्ये सकाळपासून पूर्णपणे बंद पाळण्यात आला. प्रत्येक घटकाने कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने शासनाने केलेल्या संचार बंदीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळेच नाशिक मध्य, जुने नाशिक, पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिक रोड या सर्व विभागांत कुठेही जमाव दिसून आला नाही, नागरिकांनी घरात थांबणे पसंद केले. शहरातील काही ठिकाणी दूध खरेदीची गर्दी वगळता सर्व कामकाज शांत होते. भल्या पहाटेच वर्दळ असलेली बाजार समितीही शांत होती. 

शहरातील रामकुंड, फूलबाजार, मेनरोड, जॉगिंग ट्रॅक, सीबीएस चौक, अशोक स्तंभ, गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, भोसला सर्कल, जेहान सर्कल, एबीबी सर्कल, मायको सर्कल, सिटी सेंटर मॉल, द्वारका, मुंबई नका ही गजबजलेली ठिकाणे शांत होती. सकाळी लवकर दशक्रिया विधी आटोपून गंगेवर आलेल्या मयताच्या कुटुंबीयांनी मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत विधी आटोपून परतले. त्यामुळे संचारबंदीच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठराविक अंतराने एखादी दुचाकी, चौकांमध्ये पोलिस कर्मचारी दिसून आले. क्वचित दिसून आलेल्या रुग्णवाहिका यापेक्षा कोणतीही वर्दळ दिसून  आली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT