बारामतीतील विकासाचे काम देशातील प्रत्येक खासदाराने पहावे : नायडू
बारामतीतील विकासाचे काम देशातील प्रत्येक खासदाराने पहावे : नायडू  
मुख्य बातम्या

बारामतीतील विकासाचे काम देशातील प्रत्येक खासदाराने पहावे : नायडू

सकाळ वृत्तसेवा

बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनाला आकार देण्याचे काम बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. दिल्लीत गेल्यानंतर सर्व खासदारांनी एकदा तरी बारामतीला भेट देऊन येथे सुरु असलेले ग्रामीण विकासाचे काम पाहावे असे आपण सांगणार आहोत, असे कौतुकाचे उद्‌गार उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी काढले.

बारामती भेटीनंतर विद्या प्रतिष्ठान येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासमवेत उपस्थित होते. 

बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र रोल मॉडेल...  बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र हे देशातील इतर कृषी विज्ञान केंद्रासाठी रोल मॉडेल आहे असे सांगत नायडू म्हणाले, बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतक-यांसाठी सुरु असलेले काम उल्लेखनीय असून देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी याचा आदर्श घ्यायला हवा. प्रयोगशाळेतून शेतक-यांच्या शिवारापर्यंत संशोधन पोहोचवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतक-यांचा सर्वांगिण विकास साधण्याचे हे काम पाहून आपण प्रभावित झालो आहोत. कृषी तसेच शिक्षणाच्या बाबतीत बारामतीचा जो विकास झाला तो पाहून मला समाधान वाटले. 

जग वेगाने बदलते आहे त्या मुळे कृषी क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. संशोधनासोबतच सुरु असलेले पूरक कामही उपयुक्त असून त्याचा फायदा सर्वांना होतो आहे हे समाधानाचे आहे. मला स्वतःला शेतीची पार्श्वभूमी असून बारामती पाहून मी प्रभावित व समाधानी आहे हे त्यांनी आवर्जून नमूद केले.  संशोधन पुरेसे नाही.  कृषी क्षेत्रात देशाने मोठ्या प्रमाणावर संशोधन केले असले तरी जगाचा वेग पाहता ते पुरेसे नाही, ग्रामीण भागातील लोकांनाही विकासाची फळे चाखता यावीत असे नेहमी वाटत असते. नैसर्गिक संकट, मान्सूनचा लहरीपणा व बाजारपेठेचे संकट आणि वाढती स्पर्धा या मुळे अशा कृषी विज्ञान केंद्रांची अधिक गरज आहे, असे नायडू म्हणाले. स्व.अप्पासाहेब पवार व राजेंद्र पवार यांचाही या योगदानाबद्दल उल्लेख करुन त्यांनी या कामगिरीबद्दल त्यांचेही कौतुक केले. 

बारामती विमानतळावर उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते व बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी स्वागत केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT