अकोलेतील दोन गावांत गटशेतीतून आदिवासी शेतकऱ्यांना प्रोत्साहन
अकोलेतील दोन गावांत गटशेतीतून आदिवासी शेतकऱ्यांना प्रोत्साहन 
मुख्य बातम्या

अकोलेतील दोन गावांत गटशेतीतून आदिवासी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

टीम अॅग्रोवन

नगर : आदिवासी भागातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे विक्री ठिकाणी उपलब्ध होण्यासह दर्जेदार माल उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोले तालुक्यातील म्हाळुंगी व वीरगाव-गणोरे येथे गटशेतीसाठी दोन शेतकरी गट केले आहेत. त्यात सुमारे ९५ शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांना शेडनेट, पाॅलिहाउस उभारून देण्यात येत आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या मालाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आश्रमशाळा, सैन्य विभागाशी करार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. 

शेतीमधील उत्पादनासोबत उत्पन्न दुप्पट करण्याचा आणि शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यानुसार या गावांत गटशेती अधिक सक्षम करण्याचे नियोजन आहे. म्हाळुंगीच्या शेती गटात ५७, तर वीरगाव-गणोरेच्या गटात ३७ शेतकरी सहभागी झाले आहेत. म्हाळुंगीमधील बहूतांश शेतकरी आदिवासी आहेत. तेथे ३२ शेतकऱ्यांना, तर वीरगाव- गणोरेत २९ शेतकऱ्यांना पाॅलिहाउस, शेडनेट उभे करून दिले जात आहेत. त्यातील १५ कामे पूर्ण झाली आहेत. दोन्ही गावांच्या गटातील शेतकरी भाजीपाला उत्पादित करत आहेत. 

अकोले तालुक्यात आदिवासी आश्रमशाळा आहेत. म्हाळुंगीच्या गटाने त्या शाळांना भाजीपाला पुरवठा करण्याबाबत करार केला आहे. वीरगाव- गणोरेचे शेतकरी पूर्वीपासूनच भाजीपाला पिकवून मुंबईला पुरवठा करतात. त्यात अधिक दर्जेदारपणा यावा, हा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. हा भाजीपाला पुरवठा करण्यासंदर्भात औरंगाबाद, नगरमध्ये सैन्य दलाशी करार केला जाणार आहे. जिल्ह्यात आदिवासी भागात असा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येत आहे. 

टॅक्ट्ररसह अवजारांचा पुरवठा 

शेतीचे कष्ट कमी व्हावेत, मजूर टंचाईवर मात करता यावी, म्हाळुंगी व वीरगाव- गणोरे येथील शेतकरी गटांना गटशेतीस प्रोत्साहन योजनेतून एक टॅक्ट्रर व पाच टॅक्ट्ररचलित औजारे  दिली आहेत. गटाबाहेरील शेतकऱ्यांनाही भाडेतत्त्वावर अवजारे दिली जातात. त्यातून आलेल्या पैशातून अवजाराची देखभाल होण्याला मदत होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT