ई - नाम आढावा बैठक 
मुख्य बातम्या

‘ई -नाम’अंतर्गत पाच राज्यांमध्ये आंतरराज्य व्यापार सुरू करणार : पी. के. स्वाईन

टीम अॅग्रोवन

पुणे  : आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजारांतर्गत (ई - नाम) महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आंतरराज्य व्यापार (इंटरस्टेट ई-ट्रेड) सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव पी. के. स्वाइन यांनी दिली. याअनुषंगाने राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांचे सचिव आणि व्यापाऱ्यांना त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले. 

ई-नाम अंतर्गत इंटरस्टेट ई-ट्रेडला चालना देण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळामध्ये नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी आंतरराज्य व्यापाराबाबत पी. के. स्वाइन यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक दीपक शिंदे, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व तमिळनाडू या राज्यांच्या पणन विभागाचे अधिकाऱ्यांसह राज्यातील ई-नाममध्ये निवड झालेल्या महत्त्वाच्या बाजार समित्यांचे सचिव व व्यापारी उपस्थित होते.  

या वेळी श्री. स्वाइन म्हणाले, की केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेची राज्यातील ६० बाजार समित्यांमध्ये अंमलबजावणी सुरू आहे. ई-नामची अंमलबजावणी इंट्रामंडी (बाजार समिती स्तरावर), इंटरमंडी (राज्यातील २ बाजार समित्या) व इंटरस्टेट (दोन राज्यातील बाजार समित्या) या तीन स्तरांमध्ये विभागण्यात आली आहे. लवकरच राज्यातील बाजार समित्यांची आंतरराज्य ई व्यापाराला चालना देण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 

प्रधान सचिव अनुपकुमार म्हणाले, की ई - नाम अंतर्गत होणारा व्यापार हा शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. यामाध्यमातून शेतीमालाला राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या व्यवस्थेकडे सकारात्मक दृष्टीने पाहून याची अंमलबजावणी करावी. या वेळी पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, आंध्र प्रदेशचे पणन विशेष आयुक्त श्री. प्रद्युम्न, तेलंगणाच्या पणन संचालक श्रीमती लक्ष्मीबाई यांनी इंटरस्टेट ई-ट्रेडच्या अनुषंगाने आपपल्या राज्यातील बाजार समिती कायद्यातील तरतुदींबाबत माहिती दिली. या वेळी सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले. दीपक शिंदे यांनी आभार मानले. 

मुंबई, पुण्यातील कामकाज असमाधानकारक  ‘ई - नाम’ अंतर्गत राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांचे कामकाज अत्यंत असमाधानकारक असल्याबाबत केंद्रीय सहसचिव पी. के. स्वाइन यांनी नाराजी व्यक्त केली. पुणे, मुंबई, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, खामगाव, गोंदिया, हिंगोली व सेनगाव येथील बाजार समित्यांचे कामकाज असमाधानकारक असल्याने स्वाइन यांनी नाराजी व्यक्त केली. पुणे, मुंबईसारख्या महत्त्वाच्या बाजार समित्यांवर प्रशासक असून, देखील या बाजार समित्यांमध्ये ई नामची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. मुंबई बाजार समितीवर खुद्द सहकार आयुक्त सतीश सोनी प्रशासक आहेत. पुणे बाजार समितीवर अप्पर निबंधक दर्जाचे अधिकारी बी. जे. देशमुख प्रशासक आहेत. देशमुख हे बाजार व्यवस्थेमध्ये रस असणारे अधिकारी असून, ते देखील ई नामच्या अंमलबजावणीबाबत अपयशी ठरल्याचे चित्र आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT