एकनाथ डवले
एकनाथ डवले  
मुख्य बातम्या

हळद प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी गट स्थापन करावे ः एकनाथ डवले

टीम अॅग्रोवन

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्राचा मोठा विस्तार झाला आहे. सुधारित लागवड तंत्रामुळे उत्पादनवाढ झाली आहे. जिल्ह्यात हळद प्रक्रिया उद्योगासाठी संधी आहेत. शेतकरी गट स्थापन करून हळद प्रक्रिया उद्योगासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कृषी तथा जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी केले. सचिव डवले रविवारी (ता. ४) हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असता शिरड शहापूर (ता. औंढा नागनाथ) येथील हळद-कोचा बाजाराला त्यांनी भेट देऊन माहिती घेतली. या वेळी लातूर विभागाचे कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, उपविभागीय कृषी अधिकारी बळिराम कच्छवे, तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपहाड (वसमत), बी. आर. वाघ (औंढा नागनाथ) आदी उपस्थित होते. या वेळी श्री. डवले म्हणाले, की गादीवाफा पद्धतीने लागवड केली जात असल्यामुळे हळदीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळद लागवड होत आहे. मूल्यवर्धन होण्यासाठी हळद प्रक्रिया उद्योग उभारणीची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी गट स्थापन करून एकत्र आले पाहिजे. जिल्ह्यात हळद शिजविण्यासाठी कुकरनिर्मितीचे उद्योग सुरू झाले आहेत. परंतु, सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्योजकांनी हळद शिजवणी यंत्राचे परीक्षण कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत करून घेतल्यानंतरच कुकरची विक्री करणे आवश्यक आहे. तत्पूर्वी, श्री. डवले यांनी गिरगाव (ता. वसमत) येथील हळद पिकांवरील शेतीशाळेस भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतीशाळा तसेच क्रॉपसॅपअंतर्गत विविध पिकांवरील किडींच्या प्रादुर्भावाची निरीक्षणे नियमित घेतली जातात की नाही, याबाबत शेतकऱ्यांना विचारणा केली. पळसगाव (ता. वसमत) येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कृषी सहायकासाठी सुरू करण्यात आलेल्या कक्षाचे उद्घघाटन श्री. डवले यांच्या हस्ते झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT