मुळा धरणातील पाणीसाठा
मुळा धरणातील पाणीसाठा 
मुख्य बातम्या

मुळा धरणात ८० टक्क्यांवर पाणीसाठा

टीम अॅग्रोवन

नगर  : जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे धरण भरले आहे. आता मुळा धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी (ता. ६) दुपारी मुळा धरणाने ८० टक्क्यांचा टप्पा पार केला. मुळा नदीतून (कोतूळ जवळ) २० हजार क्युसेकने पाण्याची आवक धरणात होत आहे. मंगळवारी सकाळी धरणात २१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. २३ टीएमसी पाणीसाठा झाला की धरणातून विसर्ग सुरू केला जाईल. साधारण १५ ऑगस्टपर्यंत धरणात २३ टीएमसी पाणीसाठा स्थिर ठेवला जाणार आहे, असे ‘मुळा’चे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले. 

जिल्ह्यात सध्या फक्त अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस होत आहे. त्यामुळे उत्तरेसाठी महत्त्वाचे असलेल्या भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू आहे. भंडारदरा व निळवंडे ही धरणे भरलेली असून तेथून पाणी सोडले आहे.

मुळा धरणात मंगळवारी सकाळी दहा वाजता ८० टक्के म्हणजे पावणे एकवीस टीएमसी पाणीसाठा झाला होता. हा साठा २३ टीएमसी झाली की नदीपात्रातून पाणी सोडण्याचे नियोजन आहे. मात्र, सोमवारच्या तुलनेत पाण्याची आवक कमी झाली होती. मंगळवारीही जोरदार आवक असती तर कदाचित लगेच पाणी सोडावे लागले असते. मात्र आवक कमी असल्याने मंगळवारच्या आवकेनुसार अजून अडीच टीएमसी पाणी जमा व्हायला दोन दिवस लागतील असा अंदाज आहे.

दरम्यान, धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने खरीप पिकांच्या सिंचनासाठी मंगळवारी धरणाच्या उजव्या कालव्यातून ७५० क्‍युसेक व डाव्या कालव्यातून १०० क्‍युसेकने आवर्तन सोडण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT