Efforts of Agriculture Department to increase mango exports 
मुख्य बातम्या

आंबानिर्यात वाढीसाठी कृषी विभागाचे प्रयत्न

आंबा निर्यात व्हावी यासाठी सर्व आंबा उत्पादकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मँगोनेट पोर्टलवर सहभागी होण्याकरिता कृषी विभाग सहकार्य करेल, असे आश्‍वासन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी दिले.

टीम अॅग्रोवन

आपटाळे, जि. पुणे ः जुन्नर व आंबेगाव परिसरातील दर्जेदार आंबा निर्यात व्हावी यासाठी सर्व आंबा उत्पादकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मँगोनेट पोर्टलवर सहभागी होण्याकरिता कृषी विभाग सहकार्य करेल, असे आश्‍वासन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी दिले. 

जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथे जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील आंबा उत्पादकांसाठी कृषी विभाग आणि ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय ‘आंबा मोहोर संरक्षण’ प्रशिक्षण कार्यशाळा झाली. या वेळी बोटे बोलत होते. 

या प्रसंगी कृषी उपसंचालक विजय कानडे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रशांत शेटे, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, किरण वीरकर, विषयतज्ज्ञ भरत टेमकर, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड, उपसरपंच प्रवीण पवार, अविनाश पुंडे, राजेंद्र पवार यासह परिसरातील आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

जुन्नर व आंबेगाव तालुक्यांत गेल्या काही वर्षांपासून आंबा लागवडीत वाढ होत आहे. कोकण हापूसनंतर, जुन्नरच्या आंब्याला पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत चांगली मागणी असते. मात्र, वातावरणातील सततच्या बदलामुळे आंब्याचा मोहोर गळून पडतो. यासाठी वेळीच नियोजनात्मक उपाययोजना आखण्यासाठी आंबा उत्पादकांकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आंबा मोहोर संरक्षण या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

कृषी उपसंचालक विजय कानडे यांनी आंबा पिकाच्या निर्यातीची मानके, गुणवत्ता, दर्जा आणि परदेशातील बाजारपेठेबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. भरत टेमकर यांनी शिवनेरी आंब्याचे क्षेत्र वाढण्याच्या दृष्टीने ग्रामीण युवकांनी आंबा पिकाची रोपवाटिका उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन पुंडे यांनी केले. तर कृषी अधिकारी किरण वीरकर यांनी आभार मानले.

मोहर व्यवस्थापनासाठी उपाययोजना गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने त्याच परिणाम आंब्याच्या मोहरावर होत आहे. अशा वातावरणात फुलकिडे, तुडतुडे मोठ्या प्रमाणात मोहोरात आढळतात. यासोबत भुरी व करपा रोगाचाही धोका दिसून येतो. याकरिता आंबा बागायतदारांनी किडींच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के किंवा अझाडीरेकट्न आणि बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणाकरिता थायफिनेट मिथाइल ०.१ टक्का वेळीच फवारणी करावी, असे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate Crash : कांद्याचे ट्रॅक्टर थेट कार्यालयासमोर आणून निषेध

Traditional Fisherman : पांरपरिक मच्छीमारांची मालवण येथील कार्यालयावर धडक

Wild Vegetables : गावागावांत रानभाजी महोत्सव व्हावा : पाटील

Crop Loan : बँकांनी सर्व कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे

Onion Cultivation : कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT