online satbara
online satbara 
मुख्य बातम्या

लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडी

टीम अॅग्रोवन

पुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या ई-चावडीतून लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक कामे झाली आहेत. तलाठ्यांनी ४२ लाख सातबारा वाटले, अशी माहिती महसुल विभागाच्या सूत्रांनी दिली.   विशेष म्हणजे डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा वाटणारे संकेतस्थळ आता स्वतंत्र क्लाउडवर गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता नव्या लिंकवर जावून सातबारा मिळवावा लागेल. https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR या संकेतस्थळाला भेट देवून विविध सुविधा घेवू शकतात. महाभूमी पोर्टलने डिजिटल स्वाक्षरीत सातबारा देण्यासाठी गेल्या वर्षीपासून ‘आपला अभिलेख’ नावाचे संकेतस्थळ सुरू केले होते. आता त्यात बदल करून जीसीसी क्लाउडवर नवी लिंक आणली गेली आहे. या संकेतस्थळाच्या नावात ‘डिजिटल सातबारा’ असा शब्द वापरण्यात आला आहे.   जुन्या संकेतस्थळावरील सर्व नोंदणीकृत वापरकर्ते मात्र आधीच्याच लॉगिन आयडी व पासवर्डचा वापर करून वॅलेट खात्यातील शिल्लक रक्कम वापरू शकतात. त्या रकमेतून नवे डिजिटल सातबारा उतारे मिळवू शकतात. दरम्यान, सातबारा कामकाज ऑनलाइन केल्यामुळे तलाठ्यांना लॉकडाऊनच्या काळात चांगली सेवा देता आली, असा दावा महसुल विभागाने केला आहे. लॉकडाउन कालावधीत राज्यात सरासरी रोज तीन हजार तलाठी ऑनलाइनवर होते.  ‘‘लॉकडाउनमध्ये ई-चावडीचा तलाठ्यांनी उत्तमपणे वापर केला. त्यामुळेच सव्वाचार लाख ऑनलाइन फेरफार तलाठ्यांनी घेतले. ई-चावडीत या कालावधीत तलाठ्यांनी ४२ लाख सातबारा उतारे तर २० लाख खाते उतारे वाटले. दोन लाख फेरफार उतारे देखील दिले.याच कालावधीत महाभूमी पोर्टलवरून सव्वा तीन लाख डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारे डाऊनलोड केले गेले,’’ अशी माहिती महसुल विभागाच्या सूत्रांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT