Dust sowing started in Kolhapur district
Dust sowing started in Kolhapur district 
मुख्य बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात धूळवाफ पेरणीस प्रारंभ

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात धूळ वाफ पेरण्यास सुरुवात झाली आहे. रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरण्या ना प्रारंभ झाला. ‘रोहिणीचा पेरा, फुलेल मोत्याचा तुरा’ ही शेतकऱ्यांत भावना असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी धूळवाफ पेरण्यास सुरुवात झाली. या मुहूर्तावर भात व धण्याची बहुतेकांनी पेरणी केली. पेरणीचे पारंपरिक साधन असलेल्या कुरीचे (तिफन) पूजन करण्यात आले.

शेतीची साधने, पद्धती कितीही आधुनिक झाली असली तरी शेतकरी परिवाराचे अद्याप पिढ्यानपिढ्या परंपरांशी नाते आहे.त्यानुसार आज रोहिणी नक्षत्राचे निमित्त साधत शेतकऱ्यांनी शेणाने सारवलेल्या जमिनीवर कुरीचे पूजन झाले. शेतीतून मिळणारे उत्पन्नच कुटुंबाचा मोठा आधार असल्याने सर्व कुटुंबीय या पूजेत सहभागी झाले. बहुतेक शेतकऱ्यांनी सहकुटुंब मिळूनच पेरणीला प्रारंभ केला.पेरणीला कुरीचा दांडा घेऊन पुढे ओढणारे व मागे पेरणीसाठी दाणे सोडणारे एकाच घरातील त्यामुळे सहकुटुंब कष्टाचेही दर्शन या निमित्ताने घडले. पेरणीनंतर लगेच पाणीही देण्यात आले. रोहिणी नक्षत्रावर पेरणी झाली की एक दोन दिवसांत पावसाची एखादी सर पडून जाते, अशी एक शेतकऱ्यांत भावना आहे.

येत्या काही दिवसांत माॅन्सूनची सुरू होईल, या आशेवर पश्चिम भागात धूळवाफ भात पेरणीला प्रारंभ झाला आहे. जवळपास ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या कोरोनाचे संकट उभे असताना सुद्धा बळीराजा भात पेरणीत मग्न असल्याचे ग्रामीण भागात चित्र दिसत आहे.

या परिसरात शेतकरी प्रामुख्याने ऊस शेतीच करतात. तसेच भात सूर्यफूल, मका, भुईमूग व भाजीपाल्याचे पीक घेतात. सूर्यफूल, भुईमूग व मका पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. यंदा या परिसरात वळीव पाऊस बऱ्यापैकी झाला. ऊस भरणीची कामे अंतिम टप्प्यात असून ऊस जोमदार आहे. आडसाली ऊस लागणीसाठी सरी सोडायची धांदल सुरू आहे. मशागत करून शेतकरी कुरीच्या साह्याने धूळवाफ पेरण्या करत आहेत.

शेतकरी पारंपरिक बियाणे टाळून संकरित वाणाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या विविध भात बियाण्यांचा वापर करत आहेत.या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्राकडे धावपळ करावी लागते. कृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मशागतीसाठी बैलांचा वापर कमी झाला आहे. ट्रॅक्टर व पावर टिलरचा वापर वाढला आहे. जेथे पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी भात पेरणी करून पाणी दिले आहे. माॅन्सून आगमनाची शक्यता गृहीत धरून खरिपाच्या कामासाठी शिवार माणसांनी फुलली आहेत. मे अखेर धूळवाफ भात पेरणी पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT