मुसळधार पावसामुळे  वार्षिक सरासरी ओलांडली  Due to torrential rains Annual average exceeded 
मुख्य बातम्या

मुसळधार पावसामुळे  वार्षिक सरासरी ओलांडली 

जूननंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदा सव्वातीन महिन्यांतच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे.

टीम अॅग्रोवन

नांदेड : जूननंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदा सव्वातीन महिन्यांतच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात १ जून ते १० सप्टेंबर या कालावधीत सरासरी ९६३.१० मिलिमीटरनुसार १०८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.  जिल्ह्यात १ जून ते ३१ ऑक्टोबर या पावसाळ्याच्या पाच महिन्यांत सरासरी ८९१.३० मिलिमीटर पाऊस पडतो. हे जिल्ह्याचे वार्षिक सरासरी प्रजन्यमान आहे. यात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात १०२६ मिलिमीटर, तर माहूर तालुक्यात १०१६ मिलिमीटर पाऊस पडतो. तर भोकर तालुक्यात ९६३, बिलोली तालुक्यात ९१० मिलिमीटर पाऊस पडतो. या सोबतच इतर जिल्ह्यातही सव्वासातशे मिलिमीटरच्या पुढे पाऊस होतो. दरम्यान या वर्षी जून महिन्यात पावसाने दमदार सुरू केल्यानंतर जुलैमध्ये काही दिवस पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावून पावसाळ्याच्या सव्वातीन महिन्यांतच वार्षिक सरासरी ओलांडली.  आगामी दीड महिन्याच्या काळातही पावसाची शक्यता असल्यामुळे यंदा रेकॉर्ड ब्रेक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व लहान-मोठे प्रकल्प तुडुंब भरले असून, नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यात पूर येऊन नदीकाठच्या भागातील पिके खरडून गेली. तसेच सखल भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात या वर्षी नुकसान झाले आहे. सध्या प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू आहेत. यंदाच्या भरघोस पावसामुळे आगामी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.  तालुकानिहाय पावसाची टक्केवारी (कंसात झालेला पाऊस, मिलिमीटर)  नांदेड ९३.६२ टक्के (७७७.४०), बिलोली १३१.६० टक्के (११९८.७०), मुखेड १२५.२८ टक्के (९७५.८०), कंधार ११४.९७ टक्के (९२३.००), लोहा १२३.९३ टक्के (९८५.००), हदगाव १०१.२७ टक्के (८९१.८०), भोकर १०१.४१ टक्के (९७६.९०), देगलूर ११९.९९ टक्के (९८४.९०), किनवट ११२.१२ टक्के (११५१.००), मुदखेड १०१.७५ टक्के (८४३.७०), हिमायतनगर ११४.८४ टक्के (९९६.००), माहूर ९१.४४ टक्के (९२९.७०), धर्माबाद १२७.१० टक्के (१०२४.९०), उमरी १०६.५५ टक्के (९१३.६०), अर्धापूर ११८.८३ टक्के (९४३.००), नायगाव १२६.२१ टक्के (९१३.१०) एकूण सरासरी ९६३.१० (१०८.६)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : वाशीमच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २,५६७ शेतकऱ्यांचा 'ओटीएस' कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत समावेश

Sugarcane Price : उसाला पहिली उचल ३,६०० रुपये द्या! घनसावंगीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सामूहिक उपोषण

Water Release: दुष्काळाच्या झळांना आवर्तनाचा ओलावा; ‘घोड’मधून विसर्ग

Paddy Support Price: भाताला सहा हजार रुपये हमीभाव द्या; शेतकऱ्यांसह घोटी बाजार समिती सभापती, संचालक मंडळाची मागणी

Diwali Financial Benefits: दिवाळीला शेतकरी सभासदास मिळाले प्रत्येकी ७० हजार रुपये' मानोरीच्या दिपस्तंभ शेतकरी कंपनीकडून आर्थिक नियोजन

SCROLL FOR NEXT