मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा 
मुख्य बातम्या

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा

कोजेन्सिस वृत्तसेवा

पुणे : लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यासह राज्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. राज्यात सोमवारपर्यंत (ता. ९) हलक्या ते मध्यम पावसाचा, तर मंगळवारपासून (ता. १०) हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर, रविवारी राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात अस्थिरता निर्माण झाली असून, त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. दक्षिण कोकणापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. शुक्रवारी बहुतांशी भागांत ढग असल्याने सर्वच ठिकाणच्या तापमानात थोडीशी घट झाली. काही ठिकाणी पाऊसही पडला. शनिवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे उच्चांकी ४१.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारपर्यंत राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडणार असून, मंगळवारपासून हवामान मुख्यतः कोरडे राहणार आहे.    शनिवार (ता. ७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.१, नगर ३८.०, जळगाव ३९.७, महाबळेश्वर ३०.६, मालेगाव ३९.६, नाशिक ३६.३, सांगली ३५.८, सातारा ३५.८, सोलापूर ३७.९, मुंबई ३३.१, अलिबाग ३२.७, रत्नागिरी ३१.०, डहाणू ३४.०, उस्मानाबाद ३७.६, आैरंगाबाद ३७.५, परभणी ४०.०, नांदेड ४०.०, अकोला ४०.६, अमरावती ३९.८, बुलडाणा ३७.५, चंद्रपूर ४१.२, गोंदिया ३९.८, नागपूर ४०.६, वर्धा ४१.९, यवतमाळ ४०.०.

विखळे, वेटणे येथे गारपीट विखळे, वेटणे (जि. सातारा) येथे शनिवारी दुपारी गारपीट झाली. तसेच जिल्हयातील नागठाणे (ता. सातारा), चिलारवाडी, विरळी, वडजल येथेही जोरदार पावसाने हजरी लावली. पुणे िजल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उदापूर, डिंगोरे आणि ओतूर भागातही पाऊस झाला. विदर्भातील अमरावती  येथेही पावसाने हजेरी लावली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

SCROLL FOR NEXT