Drones will be used for spraying pesticides
Drones will be used for spraying pesticides 
मुख्य बातम्या

कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन वापरणार

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि अन्य नैसर्गिक  समस्यांमध्ये तातडीने तोडगा काढण्यासाठी आणि दोन्ही हंगामात हवामानाच्या अंदाजावर आखावी लागणाऱ्या शेतीचा आराखडा त्वरित अमलात आणण्यासाठी कोकणातील कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी कोकणातील प्रयोगशील शेतकऱ्यांना ड्रोनच्या हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ड्रोनचा वापर करून आपण मोठ्या क्षमतेने कीटकांवर फवारणी करू शकणार आहे. पिकांची जोपासना तसेच त्यावर काही दुष्परिणाम तरी होणार नाहीत ना याची काळजी कृषी मंत्रालय घेत आहे. पीक फवारणी क्षेत्र, वजनाची मर्यादा किती आहे तसेच उड्डाणाचा परवाना, नोंदणी, सुरक्षा विमा अशा हंगामी परिस्थितीचा यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. ज्या वेळी ड्रोन उडवायचे आहे किंवा खाली घ्यायचे आहे. या वेळी सुद्धा काळजी घ्यावी लागते. अशी नियमावली ठरवून देण्यात आलेली आहे. या बाबत आता कोकणातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वेंगुर्ला प्रशिक्षण केंद्रात या बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

काळाच्या ओघात शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. पिकांवरील किडींचे नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीमध्येही बदल होत आहे. ड्रोनच्या वापराला केंद्र सरकारने काही नियमावली जारी केली आहे. आता ड्रोन वापराची प्रत्यक्ष गरज असून, जानेवारी महिन्यापासून कोकणातील शेतकऱ्यांना ड्रोन कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी कोकण कृषी विद्यापीठात नव्या तंत्राची माहिती देण्यासाठी केंद्राची उपलब्धता करण्यात येणार आहे. तसेच शेतीसाठी ड्रोन किती महत्त्वाचे आहे. याची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 कीड व्यवस्थापनासाठी उपयुक्त ड्रोनच्या वापराने खरिपात पीकस्थिती, पीकपाहणी, कीड-रोग निर्मूलन, किडींचे व्यवस्थापन आदी कामे सुलभ होणार आहेत. पिकावर असलेली कीड आणि त्याचा प्रादुर्भाव ड्रोनच्या हाय डेफिनिशन कॅमेरामुळे सहज पाहायला  मिळणार आहे. किडीवर आळा घालण्यासाठी योग्य ती प्रमाणात कीटकनाशक वापरता येणार आहेत  ड्रोनच्या वापरामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत कीटकनाशक फवारणी होणार आहे. जास्त उंचीवरून फवारणी केल्याने सगळीकडे समान फवारणी होणार आहे. बागायती क्षेत्रात हे तंत्र अवलंबिणे शक्य होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT