Drone survey of lands in Sangamner taluka
Drone survey of lands in Sangamner taluka 
मुख्य बातम्या

संगमनेर तालुक्यात जमिनींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

टीम अॅग्रोवन

संगमनेर, जि. नगर : संगमनेर तालुक्यातील २४ गावांमधून जाणाऱ्या महारेलच्या नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत तळेगाव पट्ट्यातील नान्नज, पारेगाव खुर्द, पिंपळे आदी गावांमधील जमिनीचे शनिवारी (ता. १७) ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. 

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी जमिनीच्या मोजणीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. संगमनेर तालुक्यातील २४ गावांमधून हा बहुचर्चित रेल्वे मार्ग जाणार आहे. या मार्गासाठी ४ हजार ७६२ शेतकऱ्यांची ४४७ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व माळवाडी या दोन गावांतील मोजणी पूर्ण झाली आहे. 

देशातील पहिल्या सेमी हायस्पीड पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची पुणे, नगर व नाशिक या तीनही जिल्ह्यातील नागरिकांना अनेक वर्षांपासून उत्सुकता होती. केंद्र सरकारने या रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

सर्वप्रथम सर्वेक्षण व मोजणी करून ही जमीन ताब्यात घेतली जाणार आहे. पुणे-नाशिक हा २३५ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग नगर- पुणे व नाशिक या जिल्ह्यातून जात आहे. या मार्गावरून ताशी १८० किलोमीटर या वेगाने रेल्वे धावणार आहे. 

प्रस्तावित रेल्वे मार्गावर १८ बोगदे आहेत.

तालुक्यातील सर्वाधिक जमिनीचे संपादन पोखरी हवेली गावातून होणार आहे. नोटिसा देण्याची कार्यवाही सुरूरेल्वेमार्ग जाणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना  नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

रेल्वेमार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचे मागील तीस वर्षांचे अभिलेख तपासून त्यानंतर ही जमीन खरेदी केली जाणार आहे. साडेसोळा  हजार कोटींचा प्रकल्प असून, तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा महारेलचा प्रयत्न आहे. या रेल्वे मार्गामुळे नाशिक व पुणे ही दोन महानगरे रेल्वेमार्गाने  जोडल्याने दळणवळणाची सुविधा वेगवान होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT