'ऊस ठिबक'साठी हेक्टरी ८५ हजारांची कर्ज मर्यादा
'ऊस ठिबक'साठी हेक्टरी ८५ हजारांची कर्ज मर्यादा 
मुख्य बातम्या

'ऊस ठिबक'साठी हेक्टरी ८५ हजारांची कर्ज मर्यादा

टीम अॅग्रोवन

पुणे  : भविष्यातील लहरी हवामान आणि पाणीटंचाई यामुळे ऊस पिकाला फटका बसू नये आणि कमीत कमी पाण्यावर दर्जेदार ऊस उत्पादनासाठी ठिबक सिंचन याेजनेची हेक्टरी कर्ज मर्यादा ८५ हजार रुपये निश्‍चित करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हे कर्ज शेतकऱ्यांना २ टक्के व्याज दराने पाच वर्षांसाठी उपलब्ध हाेणार असून, एकूण ५.५० टक्के व्याजापैकी ४ टक्के व्याज राज्य सरकार आणि १.२५ टक्के व्याज संबंधित साखर कारखाना भरणार आहे. पुढील दाेन वर्षांत (२०१८-१९) सुमारे ३ लाख हेक्टर ऊस ठिबक सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राज्यातील वाढत्या ऊस क्षेत्रामुळे पाण्याचा वापरदेखील वाढला आहे. ऊसाला प्रवाही पद्धतीने पाणी देण्याची पद्धत प्रचलित आहे. या पारंपरिक पद्धतीमुळे उसाच्या पूर्णवाढीला लागणाऱ्या पाण्यापेक्षा ५० टक्क्‍यांपर्यंत जास्त पाण्याचा वापर हाेताे. जास्त पाण्यामुळे जमिनींचा पाेतदेखील खराब हाेत असल्याचे संशाेधनातुन समाेर आले आहे. यापद्धतीमुळे हाेणारा पाण्याचा अपव्यय थांबवून शिल्लक राहणाऱ्या पाण्याचा वापर इतर पिकाला व्हावा, यासाठी राज्यातील संपूर्ण ऊस पीक ठिंबक सिंचनासाखाली आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. यासाठी अल्प व्याज दरातील याेजना सरकारने आखली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT