डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्थापना दिन साजरा 
मुख्य बातम्या

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा स्थापना दिन साजरा

टीम अॅग्रोवन

अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा स्थापना दिन नुकताच (ता. २०) साजरा करण्यात आला. 

विद्यापीठ मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजारोहण करण्यात आले. कुलगुरू व अन्य अधिकाऱ्यांनी कृषी क्रांतीचे प्रणेते पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली अर्पण  केली. 

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, विद्यापीठ अभियंता रामदास खोडकुंभे, विद्यापीठ नियंत्रक संदीप गोगटे आदी उपस्थित होते. 

५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान शिवारफेरी दरवर्षी विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून होणारी तीन दिवसीय विद्यापीठ शिवार फेरी यावर्षी विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर लगेच दिवाळीचे पर्व सुरू होत असल्याने यावर्षी ही शिवारफेरी ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अकोला, बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांसाठी ५ नोव्हेंबर, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांसाठी ६ नोव्हेंबर तर ७ नोव्हेंबरला यवतमाळ, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांतील शेतकरी शिवार फेरीमध्ये सहभागी होतील. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT