डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार परिषदेवर दिलीप फुके
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार परिषदेवर दिलीप फुके 
मुख्य बातम्या

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार परिषदेवर दिलीप फुके

टीम अॅग्रोवन

अकोला  ः वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील प्रगतिशील शेतकरी दिलीप नारायण फुके यांची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिक्षण विस्तार परिषदेवर स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  प्रगतिशील शेतकरी या गटातून त्यांची ही नियुक्ती एक एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ अशी दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. श्री. फुके हे बीबीएफ तंत्रज्ञान प्रसारासाठी सातत्याने अग्रेसर आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शनासोबतच त्यांनी शेतीतही विविध प्रयोग केले. त्यांच्या या अनुभवाचा फायदा शेतकऱ्यांसह विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार परिषदेला होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.  दरम्यान, या परिषदेची २७ फेब्रुवारी रोजी बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल, अशी माहिती विद्यापिठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी कळविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT