Dr. Bharti Pawar Became the first woman Union Minister from Nashik.  
मुख्य बातम्या

नाशिकमधून डॉ. भारती पवार ठरल्या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री

टीम अॅग्रोवन

नाशिक : २०१९ मध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपच्या डेऱ्यात दाखल होत विजयी झालेल्या डॉ. भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. जिल्हा परिषद ते केंद्रीय राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास संघर्षमय आहे. नाशिक जिल्ह्यातून केंद्रीय मंत्रिपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. 

वैद्यकीय पदवीधर असलेल्या डॉ. पवार या माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा आहेत. राजकारणाच्या उंबरठ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर २०१२ मध्ये उमराणे (ता. देवळा) गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवीत त्यांनी मिनी मंत्रालयात प्रवेश केला. त्यांच्या या राजकीय वाटचालीत पती प्रवीण पवार यांचे पाठबळ महत्त्वपूर्ण राहिलेले आहे.

अनुसूचित जमातीसाठी राखीव दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र भाजपचे हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्याकडून पराभूत झाल्या. त्यानंतर पुन्हा ताकदीने तयारी केली. २०१७ मध्ये पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्या मानूर (ता. कळवण) गटातून दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत आल्या. पुढे २०१९ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी होत हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या जागी भाजपकडून निवडणूक लढवली. अन् स्वतःची ताकद व भाजप संघटन हे सूत जुळवून ती जिंकली. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे प्रचारसभा घेतली होती.

१९६२ मध्ये नाशिक लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री झाले. ते येथून बिनविरोध निवडून गेले होते. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील डॉ. पवार या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत. १३ सप्टेंबर २०१९ पासून आरोग्य आणि कुटुंब कल्याण स्थायी समिती सदस्या, ९ ऑक्टोबर २०१९ पासून निवृत्ती वेतन समिती सदस्या राहिल्या आहेत. 

शेती, आरोग्य प्रश्‍नांवर सातत्याने मांडणी 

कृषिपंप वीजपुरवठा, पीककर्ज, पीकविमा, शासकीय आधारभूत दराने मका खरेदी यावर त्यांनी सातत्यपूर्ण आवाज उठविला आहे. द्राक्ष व कांदा रेल्वे वाहतूक, शेतीमाल निर्यात अनुदान, कांदा निर्यात, आदिवासी भागात आरोग्य सुविधा व विविध योजना, द्राक्ष क्लस्टर डेव्हलपमेंट योजना या बाबींवर सातत्यपूर्ण केंद्राकडे अभ्यासपूर्ण मांडणी त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नाशिककरांना अनेक अपेक्षा लागून आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT