संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सोलापुरात दिवाळीपूर्वी कर्जमाफी मिळण्याबाबत साशंकता

Sudarshan Sutaar

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा (कर्जमाफी) लाभ देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ९३ हजार शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. जिल्हा बॅंकेशी संबंधित सर्व १२०० सोसायट्यांमधीलही शेतकरी अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. पण राष्ट्रीयीकृत बॅंकांकडील आकडेवारी अद्यापही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत साशंकताच आहे.

सोलापूर जिल्ह्यात जवळपास दीड लाखाहून अधिक लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. सहकार विभाग यासाठी पूर्ण क्षमतेने काम करत आहे. पण कागदपत्रे, शेतकऱ्यांच्या नावांची यादी, बॅंकांशी समन्वय या सगळ्या कामांमध्ये सहकार विभागाची चांगलीच दमछाक होते आहे. पण तरीही बहुतेक सर्व कामे आटोपण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिवाळीपूर्वीच पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे सूतोवाच केले.

जिल्हा बॅंकेकडील अर्जांच्या पडताळणीसाठी ७३ लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. ऑक्‍टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीदिवशी ग्रामसभांमधून त्याचे चावडीवाचनही झाले. त्यानंतर संबंधितांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. पण राष्ट्रीयीकृत बॅंकांकडील कर्जमाफीची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही. परंतु या बॅंकांच्या विभागीय आणि मुख्य कार्यालयाकडून त्याचा पाठपुरावा सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT