विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर थेट बांधावर 
मुख्य बातम्या

विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर थेट बांधावर

टीम अॅग्रोवन

जायकवाडी, जि. औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी (ता. १२) पैठण तालुक्‍यातील विविध गावशिवारात थेट बांधावर जावून सर्व पिकांची पाहणी केली. विशेषत्वाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत, ऊस पाणी व्यवस्थापन पद्धतीविषयी तसेच शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध समस्याविषयी माहिती घेतली.

पैठण तालुक्‍यात अचानक दौरा करून कातपूर, करंजखेडा, रहाटगाव, आखातवाडा येथील थेट शेतातील बांधावर भर पावसात जाऊन पाहणी केली. या वेळी उपायुक्त श्री. बोथरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे हे उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकरी सध्या वापरत असलेल्या पाणी व्यवस्थापन पद्धती, त्यापासून मिळणारे उत्पादन व उत्पन्न तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्या याविषयी शेतकऱ्यांशी चर्चा केली. 

कातपूर येथील मोरे वस्तीवरील दीपक मोरे यांच्या दुग्धव्यवासाय व पशुधनाची पाहणीही आयुक्‍तांनी केली. प्रगतिशील शेतकरी राजेंद्र मोरे यांनी पशुधनाबाबत माहिती सांगितली. तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, मंडळ कृषी अधिकारी विशाल साळवे, रामनाथ कारले, कृषी पर्यवेक्षक वसंत कातबाने, किशोर पाडळे, यशवंत चौधरी, भागचंद लघाने, राजू गावडे, सचिन खराद, सचिन निवारे, कृषी सहायक मनिषा पवार, रजनी पवार, सुवर्णा अकोलकर, जयश्री पिंपरीया, संतोष भागवत, विकास वाघमारे तसेच प्रगतिशील शेतकरी देविचंद मोरे, गोकुळ रोडी, ज्ञानेश्वर मस्के, दीपक मोरे, योगेश जाधव, बाबासाहेब भुजबळ, दादासाहेब बर्डे, निवृत्ती रोडीसह चारही गावांमधील शेतकरी उपस्थित होते.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT