bengal-gram
bengal-gram 
मुख्य बातम्या

हमीभावाने हरभरा खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता निश्‍चित

टीम अॅग्रोवन

परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सन २०१९-२० च्या हंगामात हमीभावाने (प्रतिक्विंटल ४ हजार ८७५ रुपये) हरभरा खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी हरभऱ्याची प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. यंदा जळगाव जिल्ह्यासाठी सर्वाधिक १४ क्विंटल ५० किलो, तर रायगड जिल्ह्यासाठी सर्वांत कमी ४ क्विंटल १८ किलो एवढी उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांतील उत्पादकतेत यंदा वाढ करण्यात आली आहे. काही जिल्ह्याची उत्पादकता कमी करण्यात आली आहे, तर काही जिल्ह्यांची उत्पादकता गतवर्षी एवढीच आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडतर्फे राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ, महाएफपीसी अंतर्गंत शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या मार्फत हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे.  जिल्हानिहाय उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार हरभऱ्याची खरेदी करण्यात यावी, असे निर्देश सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभागातर्फे राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, विदर्भ सहकारी पणन महासंघाचे कार्यकारी संचालक, महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक यांना देण्यात आले आहेत. हमीभावाने हरभरा खरेदीसाठी जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता, कंसात गतवर्षीची उत्पादकता (क्विंटलमध्ये) ः परभणी ७.५० (५.८०), हिंगोली १३ (१०.६०), नांदेड ९ (८), लातूर ६.५० (६.५०), उस्मानाबाद ६.२५ (४.५०), बीड ६ (१.७५), जालना ६.८७ (३.५०), औरंगाबाद ५.५० (४.५०), बुलडाणा ६.५० (८), अकोला १३ (११.५०), वाशीम ७.४० (६.५०), अमरावती १२ (१२), यवतमाळ ११.७० (८.१०), वर्धा १२.१० (१०.३०), नागपूर १२.५० (१०.५०), भंडारा ५.२६ (६), गोंदिया ८.१० (८.२०), चंद्रपूर ७.५० (७.५०), गडचिरोली ७ (४), नाशिक ७ (७.५०), धुळे ७.५० (६.५०), नंदूरबार ११.४० (६.८५), जळगाव १४.५० (९.६०), नगर ७.५० (२.२०), पुणे ७.६० (३.४०), सोलापूर ६.५० (६), सातारा १० (६), सांगली ६.२६ (६.८५), कोल्हापूर ९.९५ (९.५०), रत्नागिरी ४.७८ (६.९०), रायगड ४.१८ (३.९०), पालघर ७.२८( ६.६२), ठाणे ७.०१ (६.३७).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT