Distribution of Rs. 984 crore from crop loan in Solapur district 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४ कोटींचे वाटप

सोलापूर ः जिल्ह्यात जुलैअखेर ६६ हजार १५१ शेतकऱयांना ९८४ कोटी १५ लाख रुपये (६८.४१) टक्के इतके पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप हंगामासाठी १४३८ कोटी ५२ लाख रुपयांचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. त्यापैकी जुलैअखेर ६६ हजार १५१ शेतकऱयांना ९८४ कोटी १५ लाख रुपये (६८.४१) टक्के इतके पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. आणखी ३२ टक्के वाटप रखडले आहे. पण या महिनाअखेर तेही पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

जिल्ह्यात सर्वाधिक रब्बी हंगामात पीके घेतली जातात. पण खरीपातही बऱ्यापैकी क्षेत्र आहे. यंदा कोरोनामुळे शेतकऱ्यांवर संकट आले. परिणामी, ऐन हंगामात पैशाची गरज असल्याने कर्जाची मागणी वाढली. पण, बँकांकडून टाळाटाळ होत होती. त्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या याद्यामुळे तसेच अन्य तांत्रिक अडचणी सांगत काही बँकांचे कर्जवाटप रखडवले होते. त्यात राष्ट्रीय बँका आघाडीवर होत्या.

पीककर्जाजासाठी त्या फारशा राजी नव्हत्या. परंतु जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलिस कारवाईचा इशारा दिल्यानंतर बऱ्याच बँका पुन्हा पुढे आल्या. त्यामुळेच जुनअखेर ३० टक्कयाच्याही पुढे न सरकलेला कर्जवाटपाचा आकडा जुलैमध्ये मात्र दुपटीने वाढला. 

जिल्हा अग्रणी बँकेनेही कर्जवाटपासाठी पुढाकार घेत सूचना दिल्या. पीककर्ज मागणीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन मागवण्यात आले. ज्या तालुक्यातील बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नाही किंवा जाणीवपूर्वक टाळले जाते. त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुरु केली. त्याचाही चांगला फायदा कर्जवाटप होण्यात झाला.  

बँकनिहाय पीककर्ज वाटप

बँकेचे नांव  कर्ज वाटपाचे उद्दिष्ट (रु. लाखांत) त्यक्ष वाटप  (रु.लाखांत)  टक्केवारी
राष्ट्रीयकृत बँका १०५९६९.००  ५२०४४.४१  ४९.११
खाजगी  १८२८६.००   २६५६१.१८  १४५.२५ 
जिल्हा बँक १५४५७.०० १५२९४.३७  ९८.९५
विदर्भ कोकण ग्रामीण बँक  ४१४०.००   ४५१५.६६   १०९.०७
एकूण १४३८५२.००   ९८४१५.६२ ६८.४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Edible Oil : खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचं पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरून आवाहन

Independence Day 2025: शेतकरी आणि मच्छिमारांच्या हिताला प्राधान्य; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे…

Tribal Development Scheme : योजनांची अंमलबजावणी प्रभावी आणि पारदर्शक करा

Independence Day: ...अन् झेंडा फडकला

Apshinge Military Village : ‘इथे जन्मती वीर जवान’

SCROLL FOR NEXT