betel nut
betel nut  
मुख्य बातम्या

सुपारीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी ः राजापूर तालुक्यात सुपारीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सुपारी बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानेही सुपारीला फटका बसला आहे. तालुक्यातील १६० सुपारी बागायतदारांचे ३८.१२ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे पंचनाम्यातून पुढे आले आहे. राजापूर  तालुक्यातील भू, पेंडखळे, खिणगिणी, तेरवण, कोतापूर आदी भागांमध्ये सुमारे २०० हेक्टर क्षेत्रावर सुपारी लागवड आहे. सध्या सुपारी बागांमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोवळ्या सुपारीवर परिणाम होऊन त्या गळून पडत आहेत.  बुरशीजन्य रोगामुळे चांगल्या दर्जाची सुपारी तयार होण्यामध्ये अडथळे येतात. शेतकऱ्यांचे निम्मे उत्पन्न घटत आहे. अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाच्या तडाख्याने सुपारी बागायतदारांचे नुकसान झाले आहे. त्याचे कृषी, महसूल आणि पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाने पंचनामे केले आहेत. तालुक्यातील १६० सुपारी बागायतदारांचे ३८.१२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. भरपाईबरोबरच शासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी केली जात आहे.  या विषयावर माजी पंचायत समिती सभापती अभिजित तेली यांनी मासिक सभेत प्रश्‍न उपस्थित करत कृषी विभागाकडून पाहणी करावी अशी सूचना केली होती. त्यावर अद्यापही योग्य मार्गदर्शन बागायतदारांना करण्यात आलेले नाही.

सुपारीवर कोळे रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुचवल्यानुसार पावसाळ्यापूर्वी सुपारीवर बोर्डो मिश्रणाची फवारणी, तसेच बुंध्यात आळवणी करणे आवश्यक असते. परंतु शेतकरी याचा अवलंब करत नाहीत. सुपारी झाडांच्या निरोगी वाढीसाठी अन्नद्रव्ये पाहिजे त्या प्रमाणात मिळालेली नाहीत. येथील लागवडीतील अंतर योग्य नाही, झाडांची दाटी झाली आहे. त्यामुळे फायटोप्थेरा आरेकी या प्रकारची बुरशी पसरण्यास पूरक वातावरण तयार झाले आहे.  - डॉ. वैभव शिंदे, शास्त्रज्ञ, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT