Dilip Mane, Baliram Sathe His candidature application was rejected 
मुख्य बातम्या

दिलीप माने, बळिराम साठे यांचे उमेदवारी अर्ज बाद

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या छाननीत संघाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, माजी संचालक दीपक माळी, प्रभाकर कोरे, सिद्धेश्वर अवताडे यांच्यासह २६ जणांचे अर्ज बाद झाले. दरम्यान, यापैकी अनेकजण आता थेट न्यायालयात दाद मागणार आहेत. 

जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल १३३ अर्जांची सोमवारी (ता. ३०) छाननी झाली. या वेळी ३३ उमेदवारांच्या ३५ अर्जांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांच्यासमोर सुनावणी झाली. मंगळवारी (ता.१) त्यांनी निर्णय जाहीर केला. त्यात ३५ पैकी २६ अर्ज अवैध ठरवले. यात माने, साठे, क्रियाशील संस्था मतदारसंघातील सिद्धेश्वर अवताडे, माजी संचालक दीपक माळी यांचा समावेश आहे.

मतदार म्हणून पात्र नसतानाही अर्ज भरल्याने हे अर्ज बाद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हरकत घेतलेल्यांपैकी नऊ अर्जांसह एकूण १०७ अर्ज वैध ठरले आहेत. यात माजी संचालक योगेश सोपल, विजय येलपले यांचा समावेश आहे. अर्ज बाद झालेल्यांपैकी अनेकजण आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. 

...यांचे अर्ज बाद

क्रियाशील संस्था मतदारसंघातून नारायण गुंड, अलका बंडगर, विकास गलांडे, हणमंत पोटरे, दीपक माळी, दाजी दोलतडे, सिद्धेश्वर अवताडे, बळिराम साठे, दिलीप माने, प्रभाकर कोरे, ललिता लवटे, सरस्वती भोसले, कौशल्या नवले, संताजी पाटील, तायाप्पा गरंडे, संगीता लोंढे, पांडुरंग भाकरे, महिलामधून विजया गुंड, रेवती साखरे, अनुसूचित जाती-जमातीमधून मीराबाई कसबे, इतर मागासवर्गीयामधून भीमराव कोकरे, भटक्या जाती प्रवर्गातून शहाजी पाटील यांचे अर्ज बाद झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT