diasel.
diasel. 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागात शेतकऱ्यांना घरपोच डिझेल 

टीम अॅग्रोवन

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. पुणे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वाहने, यंत्रांसाठी घरपोच डिझेल पुरविण्यासाठी सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि खेड तालुक्यासह जिल्ह्याच्या दुर्गम भागात ही सेवा राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांनी दिली.  दरम्यान, दुर्गम भागातील शेतकऱ्यांना इंधनासाठी येणाऱ्या अडचणींना ‘अॅग्रोवन’ने वाचा फोडली होती. या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली. 

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात शेतीसाठी इंधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यासाठी वाहन पंपावर घेऊन जावे लागत होते. दुर्गम भागात हे पंप दूर अंतरावर असल्याने इंधनासाठी अधिक वेळ लागत होता. त्यासाठी इंधनाचा अपव्यय होत होता. परिणामी दुर्गम भागात शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या पार्श्र्वभुमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी क्षेत्रात डिझेल वाहतूक वाहनांद्वारे घरोघरी जाऊन डिझेल वितरणाची परवानगी दिली. रेपॉस एनर्जी या संस्थेमार्फत जिल्ह्यातील दुर्गम भागात या सेवेला सुरवात करण्यात आली आहे. 

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, पंचायत समितीचे सभापती श्रीधर केंद्रे यांच्या उपस्थितीत भोर आणि वेल्हा तालुक्यात या डिझेल वितरण सेवाचा प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी भोरचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, रेपोस एनर्जीचे राजेंद्र वाळुंज व पूजा वाळुंज, निगुडघरच्या सरपंच बायदाबाई किसान कंक, वाठरचे संदीप खटापे उपस्थित होते. डिझेल पुरविणारी वाहने मोबाइल इंधन स्टेशन म्हणून काम करणार असून, आगारातून डिझेल घेऊन आणि गरजू शेतकऱ्यांना थेट पुरवतात. त्यामुळे इंधन स्थानकांकडे लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागणार नाही.  ‘अॅग्रोवन’च्या वृत्ताची दखल  दुर्गम भागातील शेतकऱ्यांना इंधनासाठी येणाऱ्या अडचणींना ‘अॅग्रोवन’ने वाचा फोडली होती. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेने उपक्रम राबविण्याचे नियोजन सुरू केले. तातडीने यंत्रणा उभी करून घरोघरी डिझेल पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारेानाच्या प्रकोपानंतर संकटग्रस्त शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला उंचावण्यासाठी, राज्य सरकार, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद शेतकऱ्यांना पाठिंबा देत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT