साश्रू नयनांनी धर्मा पाटील यांना अखेरचा निरोप
साश्रू नयनांनी धर्मा पाटील यांना अखेरचा निरोप 
मुख्य बातम्या

साश्रू नयनांनी धर्मा पाटील यांना अखेरचा निरोप

सकाळ वृत्तसेवा

गावात पाय ठेवायलाही जागा नव्हती; ठिकठिकाणी निषेधाचे फलक धुळे : आपल्या कुटुंबाला वीजनिर्मिती प्रकल्पात शानाने अधीग्रहीत जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी अखेरच्या श्‍वासापर्यंत लढा देणाऱ्या विखरण (देवाचे) (ता.शिंदखेडा, जि.धुळे) येथील धर्मा मंगा पाटील (वय ८० वर्षे) यांच्यावर मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या विखरण या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह धुळ्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. धर्मा पाटील यांना अखेरचा निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले. लढवय्या शेतकरी, असे उद्‌गार अनेक ग्रामस्थ धर्मा पाटील यांच्याबाबत काढत होते. त्यांचे पार्थिव सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मुंबई येथील एका रुग्णालयातून विखरणला दाखल झाले. त्यांचे कानाकोपऱ्यातील नातेवाईक रात्रीच पाटील कुटुंबियांच्या सांत्वनासाठी एकत्र आले होते.

सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गावातून अंत्ययात्रा निघाली. गावात पाय ठेवायलाही जागा नव्हती, एवढे शेतकरी, ग्रामस्थ अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी आले होते. धर्मा पाटील यांचा मोठा मुलगा नरेंद्र यांनी अग्नीडाग दिला.

सरकारी अनास्थेचा बळी, असा संदेश देणारे फलक गावात ठिकठिकाणी ग्रामस्थांनी लावले होते. या फलकांवर मुंबई येथील मंत्रालयाची इमारत व त्यापुढे धर्मा पाटील यांचे चित्र होते. काही ग्रामस्थांनी शासनाच्या चालढलक व दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीवर जाहीरपणे टिका करून नाराजी व्यक्त केली.

अंत्यसंस्कार करण्यापूर्वी एक शोकसभा घेण्यात आली. त्यात पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी आमदार दिलीप सोनवणे, शरद पाटील, श्‍याम सनेर व इतर नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले. धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना महिनाभरात न्याय मिळेल. त्यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन करून योग्य तो मोबदला शासन देण्याचा प्रयत्न करील, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

Loksabha Election : कसबा पॅटर्नची संधी साधणार की हुकणार

Water Scarcity : पुणे विभागात पाण्यासाठी वणवण

Cotton Production : भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर

SCROLL FOR NEXT