शरद पवार, प्रियंका गांधी
शरद पवार, प्रियंका गांधी  
मुख्य बातम्या

शरद पवार, प्रियांका गांधींच्या उपस्थितीत धनगर समाज मेळावा

टीम अॅग्रोवन

पंढरपूर, जि. सोलापूर ः धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून सवलती लागू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी येत्या ११ ऑगस्टला पंढरपुरात धनगर समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती धनगर समाजाचे नेते आमदार रामहरी रूपनवर आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी  येथे पत्रकार परिषदेत दिली.  पंढरपुरातील रेल्वे मैदानावर सकाळी दहा वाजता हा मेळावा होईल. राज्यभरातून सुमारे दोन लाख समाजबांधव या वेळी उपस्थित राहतील. स्वातंत्र्यानंतरही धनगर समाज अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, ही मागणी केल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. भाजप-शिवसेनेने धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवला नाही, उलट सत्तेसाठी वापर करून समाजाची फसवणूक केली आहे. धनगर समाजाचा आक्रोश दाखविण्यासाठी हा मेळावा घेण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख धनगर समाजबांधव उपस्थित राहतील. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना निमंत्रित केले आहे, असे ते म्हणाले. या वेळी शालिवाहन कोळेकर, माउली हळणवर, सुभाष मस्के आदी उपस्थित होते. धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी धनगर समन्वय समितीच्या वतीने पंढरपुरात येत्या ९ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण केले जाणार आहे. ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहोत, तेही ११ ऑगस्ट रोजीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, असे आमदार रूपनवर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT